केवळ फेटा घातलेले सनीचे हे रूप पाहून तुम्ही नक्कीच अचंबित व्हाल

0

डोक्यावर केवळ रंगीत फेटा आणि मिश्किल चेहरा हे आहे सनीचे नवीन रूप.  पोस्टरवरील हे रूप पाहून प्रेक्षकही अचंबित होतात आणि चित्रपटाकडे आकर्षित होतात.

पोस्टर बॉइज हा चित्रपट आज हिंदीतून प्रदर्शित झाला. लोकसंख्या नियंत्रण आणि कुटुंबनियोजन हा विषय यात  मोठ्या मार्मिकपणे मांडला आहे.

गावातील तीन तरूण तालुक्याला फोटो काढून घेतात आणि काही दिवसांनी कुटुंब नियोजनासंदर्भातील एका सरकारी पोस्टरवर त्यांचे चित्र झळकते.

आम्ही नसबंदी केलीय, तुम्ही पण केलीय का?  असा प्रश्न त्याखाली टाकल्याने गावात यांच्याबद्दल जो काही गोंधळ उडतो. त्याची धमाल या चित्रपटात पाहायला मिळते.

मूळच्या मराठी चित्रपटात असलेला श्रेयस तळपदे यात कलाकार आहे. त्याने दिग्दर्शनही केले आहे. सनी देओलसोबत त्याचा भाऊ बॉबी देओलही या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

बऱ्याच दिवसांनी एक चांगली कॉमेडी पाहायची असेल, तर हा चित्रपट जरूर पाहावा.

आमचे रेटिंग : ***

LEAVE A REPLY

*