Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

आज भोगी…जाणून घ्या भोगीविषयी सविस्तर

Share

देशदूत डिजिटल विशेष

मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला ‘भोगी’ असे म्हणतात. आज भोगी आहे. या दिवसाचे काय महत्व असेल. अनेक ठिकाणी मकरसंक्रांत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी साजरी होते. तसेच भोगीचेही महत्व अनन्यसाधारण आहे.

‘भोगी’ शब्द भुंज या धातूपासून बनला असून खाणे किंवा उपभोगणे असा याचा अर्थ होतो. ‘भोगी’ हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात तसेच महिलावर्ग नवीन अलंकार घालतात.

सासरच्या मुली ‘भोगी’चा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात तर काही ठिकाणी आजच्या दिवशी सासरीच सुनेला ठेवून तिला मान पान देतात.

या दिवसात शेतामध्ये धनधान्य बहरलेले असते. हेमंत ऋतूमध्ये येणारा हा सण आहे. त्यामुळे आहारातही त्याचा तितक्याच चविष्ट पद्धतीने वापर केला जातो.

काही ठिकाणी आजच्या दिवशी ‘भोगी’ची स्पेशल मिक्स भाजी तयार करतात. काही ठिकाणी या भाजीला ‘खिंगाट’ म्हणतात. या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढवणार्‍या अनेक पदार्थांचा यामध्ये समावेश केला जातो. तीळ लावलेली बाजरीची भाकरी, खर्डा, सर्व शेंगभाज्या, पावटय़ाचे दाणे, वांगी, बटाटा अशा सर्व भाज्यांची मिश्र भाजी असा बेत उपभोगायचा असतो.

‘भोगी’ची भाजी ही प्रामुख्याने बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते. बाजरी ही उष्ण प्रकृतीची असल्याने हिवाळ्याच्या थंडगार वातावरणात बाजरीच्या भाकरीसोबत भाजीची चव चाखणं हे केवळ चविष्टच नव्हे तर आरोग्याला पोषक आहे. यामध्ये कफनाशक गुणधर्म असतात. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात शरीरात नैसर्गिकरित्या उष्णता टिकवून ठेवण्यास मदत होते.

तसेच या दिवशी देवाची व सूर्याची पूजा करुन वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवतात. सवाशिनला जेवायला बोलवतात. तिला तेल, शिकाखाईने स्नान महिलावर्गाकडून घालतात. जेवणानंतर विडा, दक्षिणा दिली जाते.

घरातील सर्व स्त्रियाही यादिवशी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करतात. भोगीच्या दिवशी वरील पदार्थ करून सवाशिनला जेवावयास बोलावतात. तसे शक्य नसल्यास वरील पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच ‘भोगी’ देणे म्हणतात.

अशी करा भोगीची स्पेशल मिक्स भाजी

भांड्यामध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता घालून फोडणी द्या. यामध्ये शेंगदाणे, हरभरे आणि घेवडा घालून वाफाळून घ्या. हे शिजल्यानंतर त्यामध्ये भाजीची चिरलेली वांगी, गाजरसह घाला.

पाण्याच्या वाफेवर हे मिश्रण मध्यम शिजवा. भाज्या शिजताना यामध्ये चिंचेचा कोळ आणि काळा मसाला टाका. त्यानंतर गूळ, तिळाचा कूट, खोबरं आणि मीठ घालून भाजी शिजवून घ्या. त्यानंतर तुमची भोगीची भाजी तयार. पुढे बाजरीच्या उष्ण भाकरीसोबत ही भाजी तुम्ही खाऊ शकता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!