राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष खोंडे यांचे निधन

0

अहमदनगर : राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष योगीराज खोंडे यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार पुतणे, लहान भाऊ असा परिवार आहे.

पाटबंधारे खात्यातून सन 2000 मध्ये निवृत्त झालेले खोंडे यांनी गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ राज्य कर्मचारी संघटनेची धुरा संभाळली. गेल्या 17 वर्षांपासून ते राज्य संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. राज्य कर्मचार्‍यांचे विविध प्रश्न शासनदरबारी मांडणे, त्यावर चर्चा करून ते प्रश्न सुटेपर्यंत चिकाटीने त्याचा पाठपुरावा करणे यासाठीच ते अखेरपर्यंत झिजत राहिले. त्यांच्या निधनाने राज्यातील कर्मचार्र्‍यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

खोंडे यांच्या संघटनेतील कार्यकाळात राज्य सरकार पातळीवरील अनेक प्रश्‍न मार्गी लागले होते. नगरसह राज्यस्तरीय अनेक आंदोलनाचे नेतृत्व खोंडे यांनी केले. त्यांच्या निधनाने सरकारी कर्मचार्‍यांसाठी लढणारा एक लढवय्या हरपला आहे.

LEAVE A REPLY

*