Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

कॉंग्रेसने लादलेले ३७० कलम मोदी सरकारने रद्द केले – योगी आदित्यनाथ

Share

पुणे | प्रतिनिधी 

राजकारणात परमार्थ, मूल्य विचार व सिद्धांताची जपणूक करणाऱया भाजपाला साथ द्या, असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी येथे केले. मागील ७० वर्ष देशाचे विभाजन करणारे काँग्रेस पक्षाने लादलेले कलम ३७०  मोदी सरकारने रद्द केले. त्यामुळे यातून देशाची सुटका झाली असून, भारताला श्रेष्ठ भारत बनविल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

मावळ विधानसभेचे भाजपा, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार बाळा भेगडे यांच्या प्रचाराकरिता लोणावळा शहरात आयोजित सभेत योगी आदित्यनाथ यांनी मावळवासीयांना मार्गदर्शन करताना स्वार्थी राजकारणावर टीका केली. रिपाईचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव आदी उपस्थित होते.

योगी म्हणाले, राजकारण हे स्वार्थाचे नसावे. ते परमार्थ, आदर्श मूल्यांवर आधारित असावे. सत्ता राष्ट्राला समर्पित असल्यास विकास कसा होतो, हे मागील पाच वर्षात देशाने पाहिले आहे. महिला सशक्तीकरणाकरिता तिहेरी तलाकविरूद्ध कायदा करत मुस्लिम महिलांना सन्मान मिळवून दिला. अन्नदाता शेतकरी सन्मानाकरिता किसान सन्मान योजना, आयुष्यमान भारत योजना, उज्ज्वला गॅस योजना, स्वच्छतागृह, घरकुल योजना, युवकांना रोजगार दिला, शहिदांच्या कुटुंबीयांना मोठा आर्थिक आधार दिला. देशाचा व महाराष्ट्राचा विकास करण्याकरिता मोठय़ा प्रमाणात रस्त्यांचा विकास केला, नवीन कारखानदारी आणली.

राजकारण करताना विचारधारा नसली, तर असे स्वार्थी राजकारण समाजाचे व राष्ट्राचे नुकसान करते. सिद्धांतहीन राजकारण म्हणजे मृत्यूचा फंदा असल्याने संधीसाधू मंडळींना सत्तेपासून दूर ठेवा. शिवसेना व भाजपा यांची मूल्यनीती एक असल्याने हे दोन्ही पक्ष युतीच्या माध्यमातून एकत्र राजकारण करतात. पाच वर्षांनंतर देशात व राज्यात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असल्याचा दावा त्यांनी केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!