Type to search

नाशिक

अभिनव बालविकासमध्ये योगदिन उत्साहात

Share

नाशिक | प्रतिनिधी

म.वि.प्र. समाजाच्या अभिनव बाल विकास मंदिरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला .या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मिनाक्षी गायधनी, वैशाली देवरे, योगशिक्षिका मनीषा गायधनी व किर्ती ब्राम्हणकर उपस्थित होत्या. यावेळी योग शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण दिले. सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्याकडून योगासने करून घेतली.

शाळेच्या उपशिक्षिका दवंगे मंगला यांनी योग दिनाची माहिती देउन त्याचे महत्व समजावून सांगितले .मुख्याध्यापिका गायधनी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना जीवनातील योगाचे महत्व स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांनी ’आंतरराष्ट्रीय योग दिन‘ हे नाव मानवी साखळीने तयार केले. इयत्ता 1 ली ते 4 थी च्या 1280 विद्यार्थ्यांनी व 150 सेवकांनी एकाच वेळी योग साधना केली .

मुख्याध्यापिका गायधनी यांनी आलेल्या योगशिक्षकांचे पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देउन आभार व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता शांतीपाठाने झाली .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!