Type to search

Featured नाशिक

लायन्स क्लब ऑफ गोदावरी तर्फे आयोजित योगा वर्गाचा समारोप

Share

नाशिक | प्रतिनिधी

लायन्स क्लब ऑफ गोदावरी, इंदिरानगर जॉगर्स क्लब, भारतीय योग संस्थान आणि मानवता हेल्थ फाउंडेशन यांचे वतीने २ दिसंबर पासून मोफत योग वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप शनिवार दि. 7 दिसंबर रोजी माननीय पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या हस्ते पार पडला.

या शिबिरात सहभागी झालेल्या साधकांना पूरक व्यायामाबरोबरच विविध प्रकारची आसने शिकविण्यात आली व त्याच बरोबर सह्याद्रि हॉस्पिटल येथिल प्रख्यात डॉक्टर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले त्याचप्रमाणे प्राणायामांचे प्रकारदेखील सादर करण्यात आले. योगामुळे अनेक व्याधी दूर होत असल्याचे शास्त्राने सिद्ध केले आहे. नियमित योगासने केल्याने मन प्रसन्न व उत्साही राहते. शरीर व मनाची कार्यक्षमता वाढते. अतिरिक्त वजन कमी होते. वजन कमी असल्यास वाढण्यासदेखील मदत होते. त्याचप्रमाणे शरीर व मनावर नियंत्रण करणे शक्य होते.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी यावेळी महिला सुरक्षितते बाबत मोलाचे मार्गदर्शन केले. सर्व साधकाना प्रशस्तिपत्र देवून गौरवन्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्या करता लायन्स क्लब ऑफ गोदावरीचे प्रेसिडेंट सागर तलेकर, स्नेहल देव, साधना दुसाने, ललित जोशी, बी के गुप्ता, अवधूत कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, जाजू, कुलकर्णी, संदीप देव यांचे सहकर्य लाभले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!