Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

येवला : सोमठान जोश येथे तब्बल २० दिवसाआड होतोय पाणी पुरवठा

Share

येवला : गेल्या पंधरा दिवसापासून राज्यातील अनेक भागासह नाशिक जिल्ह्यातील देखील काही भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे जवळपास आठ धरण ओव्हरफ्लो झाले असून अनेक छोटे-मोठे बंधारे तुडुंब भरले आहेत. मात्र, दुसरीकडे येवला तालुक्यातील सोमठान जोश या ठिकाणी अजूनही टँकर सेवा चालू असल्याचे चित्र आहे.

यामुळे आठवडाभराने सोमठाणा जोश येथे ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा होत आहे. नाशिकपासून अवघ्या ९० किमीच्या नत्रावर असलेले सोमठाणा जोश हे गाव. या गावात अद्यापही समाधान कारक पाऊस झाला नसून नागरिक जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

गेल्या आठवड्यात मुंबईसह नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने धुमाकूळ घालत हाहाकार माजवला तर आता देखीलपश्चिम महाराष्ट्रा मुसळधार पाऊस थैमान घालत आहे. मात्र, पावसाळा सुरु होऊन दोन महिन्याचा कालावधी उलटलेला असतांना देखील सोमस्थान जोश परिसरात रिमझिम पाऊस वगळता जोरदार पाऊस झालेला नाही त्यामुळे उन्हाळ्यात निर्माण झालेली पाणी टंचाई पावसाळ्यात देखील कायम आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!