Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

येवला : विहरीत पडून दोन काळविटांचा मृत्यू

Share

विखरणी | राजेंद्र शेलार :  तालुक्यातील विखरणी येथे विहीरीत पडून दोन काळवीट असून वनअधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत दोन्ही मृत काळविटांना दहन करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी विखरणी शिवारात मनोहर खरे यांची जमीन असून त्यात मकाचे पीक घेतले आहे.  मकाला पाणी भरण्यासाठी गेले असता विहिरीच्या बाजूला मका मोठ्या प्रमाणात तुडवलेली असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. विहीरीत डोकावून पाहिले असता दोन काळवीट पाण्यावर तरंगताना दिसून आली.

 

त्यांनी वनविभागाला याची माहिती कळवली असता वनविभागाच्या कर्मचारी त्वरीत दाखल झाले. पिंजरा लावून दोन्ही मृत काळविटांना विहिरीबाहेर काढून जागेवरच शवविच्छेदन करण्यात येऊन दहन करण्यात आले.

ही दोन्ही काळविट नर जातीची असून सुमारे पाच ते सहा दिवसांपूर्वी ते विहिरीत पडले असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली असून काळविटांच्या टोळीवर ताबा मिळवण्यासाठी या दोन्ही नरजातीच्या काळविटांनामध्ये झुंज होत असताना ते अचानक विहीरीत पडुन त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!