Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नगरसूल येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखोंचे नुकसान

Share

नगरसुल । वार्ताहर : येवला तालुक्यातील नगरसुल येथील लहीत रस्त्यालगत कुडके वस्तीवर दुपारी शॉर्टसर्किट होऊन भुसा जाळून खाक झाला. केशव परबत कुडके यांच्या शेतात ही घटना घडली. सुमारे सहा ट्रॅक्टर भुसा जाळून खाक झाल्याची माहिती या शेतकऱ्याने दिली.

दरम्यान बुधवारी भर दुपारी ३ च्या सुमारास हवेने विद्युत प्रवाहाच्या तारा एकमेकावर आदळल्याने बजावला असलेल्या गवताने पेट घेतला. काही क्षणातच बाजूला असलेल्या कारभारी महादु धनवटे यांच्या घराच्या शेजारी असलेल्या चारा, भुसा याला आग लागली.

पुढील काही मिनटात आगीने रौद्र रूप धारण करीत बैल तसेच इतर साधने आगीच्या विळख्यात आल्याने बाळकृष्ण धनवटे याने स्वतःचा जीव धोक्यात घालून बैल तसेच ट्रॅक्टर व इतर गोष्टी बाजूला केल्या. परंतु यामध्ये शेतातील घराजवळील लिंबाचे व बाभळीचे झाड पूर्णतः जळाले.

आग लागल्याची बातमी समजताच सरपंच प्रसाद पाटील, भाऊलाल कुडके यांनी तात्काळ येवला नगरपालिकेचा अग्नीशामक बंब, पाण्याचा टँकर पाठविण्यास सांगितले.

या भयानक आगीमध्ये २५ किलो भुईमूगाच्या शेंगाचे तीन पोते, मकाची तीन पोती, बाजरी दोन पोती, गहु तीन पोती, हरभरा एक पोत, तुर, मुग, जाळीच्या दोन गोन्या, प्लास्टिकची ताडपत्री कागद सहा, लाकडी कांद्याची चाळ, शेती औजारे, कपडे, पाच टॅ्क्टर चारा, दोन टॅ्क्टर भुस, एक बैल गाडी, पाईप, सह जळुन खाक झाल्याची माहिती शेतकऱ्याने दिली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!