Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : पैठणी चोरी करून सीसीटीव्हीसमोर डान्स करणारे चोरटे जेरबंद; लग्नसराईत विकल्या चोरीच्या साड्या

Share

नाशिक | प्रतिनिधी

जिल्हयातील येवला शहर हे पैठणीचे माहेरघर आहे. गेल्या महिन्यात येथील नाकोडा पैठणी साडी दुकानात महागड्या पैठणी साड्या लंपास करून सीसीटीव्हीसमोर तोंड बांधून डान्स करणाऱ्या चोरट्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. याप्रकरणी येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज हाती घेत तपासाचे चक्रे फिरवली होती.

घडलेला प्रकार गंभीर असून याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी सखोल तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांच्या पथकास सदर गुन्हयातील 04 आरोपीतांना मुद्देमालासह अटक करण्यात यश आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून संशयितांचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासून चोरलेला माल कोणत्या ठिकाणी विक्री होतो आहे याबाबत कानोसा घ्यायला सांगितला.

त्यानुसार काल (दि.०४) स्थागुशाच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी येवला शहर परिसरात आरोपीतांचा शोध घेत असतांना खब-यांमार्फत मिळालेल्या गुप्त बातमीनुसार पैठणी चोरणारे काही संशयित येवला रेल्वे स्टेशन परिसरात आल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर याठिकाणी स्थागुशाने सापळा रचला. त्यानंतर काही संशयित रेल्वे स्टेशन परिसरात येताना दिसले. पथकाने त्यांचा पाठलाग केला. त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी तिथून पळ काढला. मात्र चहूबाजूंनी घेराव घालत चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

अमोल शांताराम शिंदे, वय 21, राउंदिरवाडी, ता.येवला, 2) राजु बाळसाहेब गुंजाळ, वय 21, रा. उंदिरवाडी, ता.येवला, हल्ली वैजापुर, जि. औरंगाबाद, 3) सागर अरूण षिंदे, वय 25, रा. रेल्वेस्टेषन जवळ, येवला, ता.येवला, 4) सागर बाळु घोडेराव, वय 26, रा. आडगाव चोथवा, ता.येवला यांना ताब्यात घेण्यात आले.

विश्वासात घेऊन त्यांची अधिक चौकशी केली असता साथीदार 5) कलीम सलीम षेख, रा. येवला, 6) करण फुलारी, रा. नाशिक  यांच्यासह वरील गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

दरम्यान, संशयितांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सांगितले की, संशयित सागर घोडेराव याने यापुर्वी येवल्यातील नाकोडा पैठणी दुकानात काम केलेले आहे. त्याने व त्याचा येवला विश्रामगृहातील काम करणारा मित्र कलीम शेख यांनी दोघांनी मिळुन पैठणीचे दुकानात चोरी करण्याचा कट रचला असलायची कबुली त्यांनी दिली.

यातील संशयित राजु बाळासाहेब गुंजाळ याने पैठण्या चोरी केल्याचा आनंद व्यक्त करत सी.सी.टी.व्ही. कॅमेरासमोर डान्स केला असल्याचे समोर आले आहे.

सहाही संशयित सराईत असून त्यांच्याविरोधात मनमाड रेल्वे पोलीस, येवला तालुका पोलीस ठाण्यात लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून परिसरात घडलेले अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक अशोक करपे, पोलीस उपनिरीक्षक संदिप कहाळे, पोना रावसाहेब कांबळे, भारत कांदळकर, पोकॉ
प्रविण काकड, भाउसाहेब टिळे, विषाल आव्हाड, प्रदिप बहिरम, हेमंत गिलबिले, संदिप लगड, चालक योगेश, गुमलाडू यांच्या पथकाने पैठणी घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला.


चोरलेल्या पैठण्या कमी किंमतीत विकल्या

नाकोडा पैठणीचे दुकान फोडून 48 पैठण्या, 12 घागरे, एक आयडीएल कंपनीचे कटर मशीन, 02 ड्रिल मशीन व गुन्हयात वापरलेली होण्डा शाईन दुचाकी असा एकुण 01 लाख 80 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सध्या लग्नसराई सुरू असल्याने संशयितांनी चोरून नेलेल्या पैठणी साड्या व घागरे हे कमी किंमतीचे दरात येवला तालुक्यासह सिन्नर तालुक्यातील सामान्य लोकांना विक्री केल्याचे तपासात निश्पन्न झाले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!