नाशिकच्या पैठणी उद्योगाला मिळणार चालना- अर्थराज्यमंत्री घेणार पुढाकार

0
नाशिक | वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यापासून येवला येथील पैठणी व्यावसायिक मोठ्या चिंतेत आहेत. कारण पैठणीवर वस्तू व सेवा कराचा बोजा पडल्यामुळे आता पैठणी महाग झाली आहे. खर्च वाढला असल्याने येथील व्यावसायिक चिंतेत सापडेल होते.

मात्र कालच वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पैठणी साडीवरचा वस्तू व सेवा कर कमी करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून लवकरच प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली असल्यामुळे पैठणी व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

पैठणीला महाराष्ट्राचे महावस्त्र समजले जाते. हातमाग पैठणी साडीवर लावण्यात येणारा वस्तू व सेवा कर (जीएसटी) कमी करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करुन तो कमी करण्यासाठी वस्तू व सेवा कर परिषदेकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती वित्त राज्य मंत्री दिपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली.

पैठणी साडीवरचा वस्तू व सेवा कर कमी करण्यासंदर्भात नियम 93 अन्वये सदस्य जयंतराव जाधव यांनी मुद्दा उपस्थित केला होता त्याला उत्तर देतांना श्री. केसरकर यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या संस्कृतीशी नाते लक्षात घेता, पैठणीस वस्तू व सेवा करातून करमाफी मिळावी याकरीता वस्तू व सेवा कर परिषदेकडे प्रस्ताव पाठवून शिफारस करण्याचे आश्वासन दिले. 

LEAVE A REPLY

*