Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

छगन भुजबळ रुग्णालयात दाखल; उपचार सुरु

Share

नाशिक | प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने आज सकाळी त्यांना मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

भुजबळ यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. नुकतीच विधानसभा निवडणुक पार पडली. भुजबळ यांनी आपल्या मतदारसंघासह इतर ठिकाणी प्रचाराचा धडाका धरला होता.

निवडणुकीच्या धावपळीत नेत्यांना तहान-भूक हरवून काम करावे लागले. यामुळे भुजबळांच्या प्रकृतीवर या धावपळीचा वाईट परिणाम झाला. भुजबळ यांना गेल्या ३-४ दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते, आज सकाळी नियमित तपासणी करण्यासाठी ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते.

यानंतर रक्तदाब वाढल्याचे लक्षात आल्यानंतर भुजबळांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या महत्वपूर्ण बैठकीला त्यांनी आजारी असतानाच हजेरी लावली होती असेही समजते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!