येवला पालिकेत डॉ. अब्दुल कलाम यांच्या जागी मौलाना कलाम यांच्या प्रतिमेला अभिवादन

वाचन प्रेरणा दिवशी नगरपालिकेचे अज्ञान उघड

0

येवला(प्रतिनिधी) ता. १५ :  भगतसिंग यांच्या जागी सुखदेव यांचे प्रतिमापूजन केल्याचा प्रकार देशभरात गाजला असताना आता भाजपची सत्ता असलेल्या येवला शहरातील नगर पालिकेत भारतरत्न ,माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जागी 1920 पासून महात्मा गांधीं यांच्या सोबत स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिलेल्या  व स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले..

राज्यात आणि देशात सत्तेत असलेल्या  भाजप सरकारने  माजी राष्ट्रपती,  भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले…

या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत देखील झाले. मात्र स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्त आणि क्रांतिकारक यांच्याशी फारशी ओळख नसल्याचा वारंवार प्रत्यय येतो आहे..

मात्र सोशल मीडियामधून याची चर्चा होताच डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रतिमा मागवून नव्याने फोटोसेशन करून ते व्हायरल करण्यात आले.

मौलाना अबुल कलाम आझाद हे राष्ट्रीय काँगेस चे 2 वेळा अध्यक्ष देखील होते, 11 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस ! आता येणाऱ्या 11 नोव्हेंबर ला मौलाना अबुल कलाम आझाद यांचे प्रतिमा पूजन होते का? हे बघणे औत्सुक्याचे ठरेल ! वाचन प्रेरणा दिन केवळ फार्स न ठरता शहरात चांगले ग्रंथालय सुरु व्हावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

*