Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

येवला : शेतकरी कन्या ‘एमपीएससी’त राज्यात दुसरी

Share

राजेंद्र शेलार | विखरणी 

येवला तालुक्यातील नागडे येथील प्रगतशील शेतकरी कचरू साताळकर यांची मुलगी भारती कचरु साताळकर हिने एमपीएससी परीक्षेत संपूर्ण राज्यात मुलींमध्ये दुसरा येण्याचा बहुमान मिळवला आहे.

एमपीएससीच्या परीक्षेत गुणवंत उमेदवारांची यादी जाहीर झाली. या उमेदवारांमध्ये वर्ग दोनच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी या पदावर सरळ सेवा भरतीतून भारती साताळकर यांची नियुक्ती होणार आहे.

तिच्या या यशाबद्दल आई-वडील, भाऊ आमदार व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून दररोज आठ ते दहा तास अभ्यास करुन टि.व्ही. व सोशल मिडिया पासून दूर राहून स्वप्न सत्यात उतरवले. तिच्या या यशात भाऊ वाल्मीक साताळकर यांचे योगदान लाभले आहे.

ग्रामीण भागातील मुलींना करियर निवडण्याची संधी द्यावी

ग्रामीण भागातील मुलींना त्यांचे करिअर निवडण्याची संधी द्यावी, कारण ग्रामीण भागात वयाच्या २१ नंतर आई वडील स्थळ पाहणी कार्यक्रम चालू करतात, ते न करता त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षण घेऊन द्यावे तसेच मला ग्रामीण भागातील मुलींकरता मार्गदर्शकाची भूमिका बजवायची असून जिद्द चिकाटी व अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश हमखास मिळते, मला एवढ्यावरच न थांबता जिल्हाधिकारी व्हायचे आहे, त्यादृष्टीने तयारी चालू आहे.

भारती साताळकर, एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थीनी.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!