Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पंचायत समिती सदस्याचा मुलगा शिकतोय जि. प. शाळेत; शिक्षणाधिकर्‍यांकडून सत्कार

Share

नाशिक । प्रतिनिधी

शहरापासून गाव खेड्यांतील पालकांना भुरळ घालणार्‍या इंग्रजी माध्यम शाळांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत आहे. मात्र, या मोहापासून दूर जात येवला पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड यांनी आपल्या मुलास जिल्हा परिषदेच्या पुरणगाव शाळेत दाखल केले आहे. यातून त्यांनी लोकप्रतिनिधींसमोर अनोखा आदर्श निर्माण केला आहे.

गायकवाड यांनी अशाप्रकारे वेगळ्या विचारांच्या वाटेवरून जात असल्याबद्दल त्यांचा प्राथमिक शिक्षण विभागातर्फे सत्कार करण्यात आला. प्रवीण गायकवाड हे येवला तालुक्यातील राजापूर गटातून 2012 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रथमत: निवडून आले.

आदिवासी जमिनींचा अधिकार मिळवून देण्यासाठी धडपड करणारे गायकवाड यांनी पत्नीची प्रसूतीही सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात केली होती. जिल्हा परिषद शिक्षण समितीवर कार्यरत असताना त्यांनी जिल्हा परिषद शाळांत सेमी इंग्रजी वर्ग करण्यासाठी मोलाचा वाटा उचलला. येवला तालुक्यातील 90 टक्के शाळा सेमी इंग्रजी माध्यमात रुपांतरित केल्या आहेत.

गायकवाड यांच्या भूमिकेची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी त्यांना सत्कार केला. यावेळी प्राथमिक शिक्षण विभागाचे धनंजय कोळी, प्रमोद चिंचोले उपस्थित होते.

विश्वास दाखवावा

इंग्रजी माध्यमापेक्षा प्राथमिक शाळांवरचा विश्वास दृढ करण्यासाठी आपण मुलास जिल्हा परिषद शाळेत दाखल करून आजच्या काळात समाजासाठी वेगळेपणा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा या दर्जेदार असून समाजाने शाळांवर विश्वास दाखवण्याची आवश्यकता आहे.

प्रविण गायकवाड, पं. स. सदस्य येवला

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!