Type to search

नाशिक

शासकीय अधिकारी नसल्याने पंचायत समिती सभा तहकूब

Share

राजेंद्र शेलार |  येवला येवला पंचायत समितीच्या मासिक सभेला कोणताही शासकीय अधिकारी उपस्थित नसल्याने मासिक सभा तहकूब करण्यात आली आहे. पंचायत समिती सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मोहन शेलार यांनी सभा तहकूब करण्याची सूचना मांडली होती. सभा तहकूब झाल्यानंतर पंचायत समिती सदस्य मोहन शेलार यांनी निवेदन देऊन जो पर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत सभागृहातुन उठणार नाही असा इशारा दिला असून सोमवारी होणाऱ्या सभेत प्रशासन काय भूमिका घेते याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

येवला पंचायत समितीच्या बसभापती सौ कविता आठशेरे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत शेततळ्याची अंदाजपत्रके कोणता विभाग तयार करणार याबाबत संधिग्धता असून त्याचा निर्णय घ्यावा तसेच संपूर्ण येवला तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून प्रत्येक गावात टँकरच्या होणाऱ्या खेपांची माहिती दररोज देण्यात यावी व मागील दोन महिन्यात खेडोपाडी पुरविण्यात आलेल्या खेपांची माहिती जाहीर करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या दोन विषयावर निर्णय होईपर्यंत सभागृहातुन उठणार नाही असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यामध्ये सन 2018 2019 मध्ये लाभार्थी शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी प्रस्ताव दाखल केले होते कृषि विभाग व लघुपाटबंधारे विभाग हे दोन्ही अंदाजपत्रक देण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ केली जाते याबाबत गटविकास अधिकारी यांच्या कडे तक्रार करूनही त्यावर काहीही निर्णय झालेला नाही.

पंचायत समितीच्या या बेजबाबदार कारभारामुळे तालुक्यातील असंख्य मजूरांना रोजगारापासून वंचीत राहावे लागले आहे तसेच तालुक्यात भीषण पाणीटंचाई असून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे तसेच अनेक गावांना पाण्याची खेप न करता कार्यालयीन कर्मचारी व ठेकेदार यांच्या संगनमताने खेपा केल्याची नोंद करत असल्याचे निदर्शनास येत आहे.

या प्रकारामुळे भ्रष्टाचारास वाव मिळत नाही तसेच टँकरच्या खेपामध्ये पारदर्शकता राहात नाही म्हणून पंचायत समिती सदस्यांना खेपांची माहिती देण्यात यावी पंचायत समिती सदस्य आपापल्या गणात ही माहिती सोशल मीडियावर टाकून सर्व गावाना टँकरच्या खेपांची माहिती मिळेल व यात पारदर्शकता येईल व ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी होईल असा विश्वासही मोहन शेलार यांनी व्यक्त केला आहे.

प्रशासनावर कोणाचाही वचक नाही ,दुष्काळात रोजगार हमी योजनेच्या कामाला प्राधान्य दिले पाहिजे मात्र याच कामात टाळाटाळ केली जात आहे. टँकरने पाणीपुरवठा केला जातो यात पारदर्शकता नाही, सर्व काही शंकास्पद आहे. निर्णय होत नाही तो पर्यंत सभागृहातून उठनार नाही.

मोहन शेलार, गटनेते, राष्ट्रवादी कोंग्रेस ,येवला

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!