Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

येवल्यानजीक भाविकांच्या पिकअपला अपघात; १८ जण जखमी

Share

येवला। राजेंद्र शेलार : पंढरपूर वरून परतणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीला येवल्याजवळ अपघात झाला असून या अपघातात मालेगाव तालुक्यातील १८ जण जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की येवला -नगर- मनमाड महामार्गावर येवल्यानजीक अंचलगाव पाटी जवळ पिंपळगाव जलाल शिवारात पंढरपूर वरुन परतणाऱ्या पिकअप गाडीला अपघात झाला.

यात १८ भाविक जखमी असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. मालेगाव तालुक्यातील पाळदे येथील वारकरी पंढरपूर येथून दर्शन घेऊन घरी परतत होते.

पहाटे पाच वाजेच्या सुमारास पिकअप गाडी (एमएच ४,सीपी २४४७) व मालवाहू ट्रक (केए २५, डी-७८०८) चा आपघात झाला. ट्रकने पिकअपला धडक दिली. पिकअप मधील १८ वारकरी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येवला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. जखमीपैकी काही जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!