श्रीरामपूर : लाख येथे गायीचे वर्षश्राद्ध

0

गोरक्षक संघटनानी दिल्या भेटी

खैरी निमगाव (वार्ताहर)- श्रीरामपूर तालुक्यातील लाख येथील बाळासाहेब सोनवणे यांचेकडे गायीचे वर्षश्राद्ध घालणार असल्याची बातमी सोशल मिडीया वरून व्हायरल होत असल्याने सोनवणे यांचे गायीविषयीचे प्रेम तालुक्यात चर्चेचा विषय ठरत असून त्यांच्याकडे अनेक गोरक्षक संघटनांनी भेटी दिल्या आहेत.

गाईला गोमाता संभोदन्याचा एक शास्त्र संकेत आहे. मातेच्या ऋणातुन मुक्त होण्याकरीता मृत्युनंतर पिंडदान आणी वर्षश्राद्धाला हिंदुधर्मशास्त्रात अनन्यसाधारण महत्व आहे. श्रीरामपूर तालुक्यातील लाख पढेगाव येथील बाळासाहेब रामभाऊ सोनवणे यांचेकडे असलेली आंनदी नामक गाईवर त्यांचे जिवापाड प्रेम होते.

चारण्यासाठी तिला दाव्याची कधीच गरज भासली नाही. बाळासाहेब सोनवणे यांचा लळा लागल्याने गाय त्यांच्या मागे येत. आनंदी गाय त्यांना खैरी निमगांव येथील आण्णासाहेब लक्ष्मण वाघ यांचेकडून आनंद मिळाल्यामुळेच गायीचे नाव आंनदी ठेवले.

आंनद मिळालेल्या या गायीने सहा जोपे दिल्यानंतर आजारी पडून आजाराचे डॉक्टरांना निदान न झाल्यामुळे आनंदीचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी गायीचा अंत्यविधी, दशक्रीया पार पाडला. सोनवणे यांचेशी संपर्क केला असता दि. 2 डिसेबंर रोजी गायीचे वर्षश्राद्ध असून सदाशीव रामकुंवर महाराज यांचे प्रवचन असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीही नाशिक मनपात विजेच्या शॉकने गायीचा मृत्यू झाल्यामुळे गायीला श्रद्धांजली वाहण्यात आली होती.

LEAVE A REPLY

*