प्रसिध्द पोस्टर मेकर अविनाश गोवारीकरने केले ‘ये रे ये रे पैसा’ सिनेमाचे पोस्टर फोटोशूट!

0

सिनेमाप्रमाणेच सिनेमाचे पोस्टरही खूप महत्त्वाचे असते.

त्यामुळेच संजय जाधव यांच्या आगामी  ये रे ये रे पैसा  सिनेमाचे पोस्टरवर खूप मेहनत घेण्यात आली आहे.

बॉलिवूडचे प्रसिध्द पोस्टर मेकर अविनाश गोवारीकरनेही या सिनेमाचे खास पोस्टरसाठी खास कलाकारांचे हावभाव कॅमे-यात टिपले आहेत. खुद्द अविनाश गोवारीकरने आपल्या सोशल मिडियावर एक फोटो पोस्ट केला आहे ज्यात तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, उमेश कामत, आणि सिद्धार्थ जाधव हे कलाकार दिसत आहे. विशेष म्हणजे या कलाकारांचे वेगवेगळे एक्सप्रेशन्स आपल्याला पाहायला मिळतायेत. येत्या ५ जानेवारी २०१८ ला प्रदर्शित होणार आहे.

नुकतेच संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ ह्या चित्रपटाचे खास पोस्टरसाठी अनोखे फोटोशूट केले आहे.

चित्रपटाच्या पोस्टरसाठी गोवारीकरांनी वेगवेगळ्या थीमनुसार हे क्रिएटीव्ह बनवले आहे.

दिग्दर्शक संजय जाधवच्या अफलातून कल्पनेतून खूपच वेगळ्या प्रकारे हे फोटोशूट झाले आहे.

अविनाश गोवारीकारांसोबत काम करण्याचा अनुभव चित्रपटाच्या कलाकारांसाठी नक्कीच खूप रंजक होता.

LEAVE A REPLY

*