Type to search

Featured हिट-चाट

‘ये साली आशिकी’ चित्रपटातून अमरीश पुरींच्या नातवाचं पदार्पण

Share

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आमरिश पुरींचा नातू मोठ्या पडद्यावर आपलं नशीब आजमवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने कलाविश्वात आपलं एक पाऊल पुढे टाकलं आहे. अमरिश पुरींचा नातू वर्धान पुरीच्या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ये साली आशिकी चित्रपटात वर्धान मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर नातवाच्या अभिनय कौशल्यामुळे अमरिश पुरींच्या अभिनयाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण चित्रपटात वर्धनने त्याच्या भूमिकेला योग्य न्याय दिले आहे. चित्रपट एका रहस्यमय कथे भोवती फिरताना दिसत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

तर चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे. वर्धान चित्रपटात मसाहीलफ नावाच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री शिवालीका ओबरॉय देखील चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. 22 नोव्हेंबर रोजी मये साली आशिकीफ चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!