अवयवदान दिनानिमित्त मुक्त ते आरोग्य विद्यापीठ पदयात्रा

0
नाशिक | अवयवदान दिनानिमित्त समाजात जनजागृती व्हावी या , पदृष्टिकोनातून रोटरी क्लबच्या पुढाकाराने नाशिक शहरातील विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येवून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठ ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हा 25 किलोमीटरचा प्रवास पदयात्रा काढून करण्यात आला. सकाळी 7 वाजता या पदयात्रेस मुक्त विद्यापीठातून सुरुवात झाली.

या पदयात्रेच्या माध्मयातून अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात आली. अवयव दानाचे महत्व पटवून देण्यासाठी या उपक्रमाचे आयेजन करण्यात आले होते.

शहरातील अंबड क्लब, तुलसी आय हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल, पीडीजी दादा देशमुख, संपूर्ण पदयात्रेचे संकल्प करणारे सर्व सहभागी, रोटे रमेश मेहेर, रोटे सुहास घारपुरे, रोटे चित्रे, रोटे डॉ. भाऊसाहेब मोरे आणि आयएमएचे अध्यक्ष डॉ. थेटे, सचिव डॉ. सोनानीस, डॉ. ढोकरे, डॉ. पगार, डॉ. रकिबे, मेक इन नाशिकचे श्रीधर व्यवहारे, मुक्त विद्यापीठाचे अभिजित पाटील, प्रा. हेमराज राजपूत प्रभारी जनसंपर्क अधिकारी संतोष साबळे यांच्यासह पीएच.डी. आणि बीबीएचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रारंभी सर्व सामाजिक संस्थांचे विद्यापीठाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

LEAVE A REPLY

*