मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय क्रीडा महोत्सव आजपासून; राज्यातील 450 खेळाडू सहभागी होणार

0
नाशिक | यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय क्रीडा महोत्सव सोमवारपासून (दि. 21,22) दोन दिवस आयोजित करण्यात आला आहे. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन नाशिक शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल हस्ते सकाळी 10.30 वाजता मुक्त विद्यापीठाच्या मैदानावर संपन्न होणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. डी. पी. नाठे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इ. वायूनंदन हे भूषविणार आहेत.

पारंपरिक महाविद्यालयांप्रमाणेच मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांच्या खिलाडू वृत्तीलाप्रोत्साहन देण्यासाठी गेल्या 13 वर्षांपासून क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. विद्यापीठाच्या अमरावती, औरंगाबाद,नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड, कोल्हापूर या 8 विभागीय केंद्रांवर या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.

विभागीय पातळीवर 100, 200, 400, 800, 1500 आणि 5000 मीटर अ‍ॅथलॅटिक्स, रिले, लांब उडी,उंच उडी, तिहेरी उडी, भालाफेक,थाळीफेक, गोळाफेक या वैयक्तिक क्रीडा प्रकारांत तर कबड्डी, खो-खो,व्हॉलीबॉल, बास्केटबॉल या सांघिक खेळांतील स्पर्धांत प्रथम स्थान मिळविलेल्या 350 मुले आणि 100 मुली अशा एकूण 450 विद्यार्थ्याची या केंद्रीय क्रीडा महोत्सवासाठी निवड झाली आहे.

या क्रीडा महोत्सवासाठी क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश अतकरे आणि विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्राच्या प्रमुख डॉ. विजया पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*