मुक्त विद्यापीठ बंदिवानांना देणार मोफत शिक्षण

0
नाशिक | ज्ञानगंगा घरोघरी असे ब्र्रीद असलेल्या मुक्त विद्यापीठाने एक महत्वाकांक्षी पाउल उचलले आहे. राज्यातील बंदिवानांना मोफत शिक्षण देण्याचा प्रस्ताव मुक्त विद्यापीठाने कारागृह महासंचलनालयाला दिला आहे. हा प्रस्ताव मंजुर झाल्यास राज्यातील 53 कारागृहातील बंदिवानांना मोफत शिक्षण दिले जाईल.

बंदिवानाना मोफत शिक्षण देण्याबाबत मुक्त विद्यापीठाकडून विचार सुरू होता. यापुर्वीही त्यांना शिक्षण दिले जात असले तरी ते मोफत नव्हते परंतु आता सरसकट मोफत शिक्षण देवून त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी विद्यापीठाने पावले उचलली आहेत.

त्यानुसार मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई वायुनंदन यांनी जेल प्रशासनाकडे आपला प्रस्ताव पाठविला असून त्याला सकारात्मक प्रतिसादही मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यापीठ समाजाशी जोडायचे असेल तर अशी कामे करावीच लागतील असा विश्वास कुलगुरूंनी बोलून दाखविला.

केवळ बंदिवानांना नव्हे तर पोलिस कर्मचारयांसाठीही वेगळा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून तो देखील राज्याच्या अधिकारयांकडे सुर्पूर्द करण्यात येणार आहे. याबााबत सामंजस्य कराराबाबतही बोलणे झालेले आहे. बंदिवानांना मोफत शिक्षण दिल्यास शिक्षण घेणारयांची संख्या वाढेल तसेच त्यांच्या जीवनातही अमुलाग्र बदल होण्यास मदत होईल त्यामुळे हे पाउल उचलण्यसात आल्याची माहिती कुलगुरूंनी दिली.

याबााबतचा प्रस्ताव मंजुर झाल्यानंतर सर्वच जेलमध्ये जावून माहिती देण्यात येवून राज्यभरात असलेल्या सुविधा केंद्रावरून अर्ज भरून घेतले जातीलत्यानंतर मोफत शिक्षण देण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या निर्णयामुळे बंदिवानाना शिक्षणाची दारे खुली होणार असून ज्यांची परिस्थिती नाही अशांनादेखील शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास मोठया प्रमाणावर मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

*