Type to search

Breaking News जळगाव विधानसभा निवडणूक २०१९

रावेर विधानसभा : अंजाळे येथे मतदान मशीन पडले होते बंद

Share

यावल प्रतिनिधी –
विधानसभेच्या मतदान प्रसंगी यावल तालुक्यातील अंजाळे गावी मतदानाची मशीन 130 मतदान झाल्यानंतर नऊ वाजेला बंद पडले होते 303 बूथ नंबर वर ही मशीन नऊ ते अकरा वाजे पावेतो बंद होती नंतर सेक्टर ऑफिसर यांनी नवीन मशीन याठिकाणी देऊन पुढची मतदान सुरू झाले.

तर मतदान ऑब्झर्वेशन ऑफिसर नरेंद्रसिंग पटेल यांनी तालुक्यात मतदान केंद्रांवर भेटी दिल्या सकाळी ढगाळ वातावरण असल्याने मतदान नाम मात्र झाली होती.

दुपारी अकरा वाजे नंतर रांगा लागलेल्या आहेत यावल पोलीस स्टेशनचे पीआय रविकांत सोनवणे व व बाहेरून मागवलेली कुमक ही बंदोबस्त करताना दिसत असून ढगाळ वातावरण व पावसाची झिमझिम हजेरी त्यामुळे मजूर वर्ग हा मोठ्या प्रमाणावर घरीच होता मतदान करा असे कार्यकर्ते गल्लीबोळात जाऊन सांगत होते त्यानुसार मतदानाची टक्केवारी दुपारी वाढत जात असताना दिसते आहे.
संध्याकाळपर्यंत रावेर विधानसभा मतदार संघ क्षेत्रात 75 80 टक्‍क्‍यांपर्यंत मतदान होण्याची शक्यता आहे शहरातील वृद्ध व अपंग यांना मतदानासाठी आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष दिसत आहे.

रावेर विधानसभा मतदार संघातील बुथ क्रमांक 265 वर सानेगुरुजी विद्यालयातील मतदान केंद्रात 82 वर्षीय वृद्ध भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव भोसले हे सपत्नीक सकाळी नऊ वाजता मतदान केले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!