यवतमाळ : भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर आकाशला लष्करात नायब सुभेदारपदावर बढती

0

भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर आकाश चिकटे याला लष्कराने हवालदारपदावरून थेट नायब सुभेदारपदावर बढती दिली आहे.

आकाश चिकटे हा मुळचा यवतमाळचा रहिवासी आहे.

ही पदोन्नती 21 वर्षानंतर मिळते पण आकाशला पाच वर्षातच मिळाली आहे.

गतवर्षी मलेशियात झालेल्या एशियन हॉकी चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक मिळाल्यानंतर आकाशला शिपाईपदावरून हवालदारपदी बढती मिळाली होती.

यावर्षी बांगलादेश येथील आशिया कप स्पर्धेत भारताला सुवर्णपदक आणि आकाशला ‘बेस्ट गोलकीपर आॅफ द टुर्नामेंट’ हा पुरस्कार मिळाला. त्यामुळे थेट नायब सुभेदारपदावर पदोन्नती देण्यात आली.

पुणे येथे इंडियन आर्मी बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये तो हवालदारपदावर कार्यरत आहे. त्याच्या कामगिरीची दखल घेत एका विशेष समारंभात भारताचे लष्कर प्रमुख बिपीन रावत व लेफ्टनंट जनरल हरपालसिंग यांच्या हस्ते आकाशला ज्युनिअर कमिशंट आॅफिसर (नायब सुभेदार) पदावर पदोन्नती देवून त्याचा गौरव केला.

LEAVE A REPLY

*