Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव

छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना : शेतकऱ्याने दिला आत्मदहनाचा इशारा

Share

यावल (प्रतिनिधी) –

छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना अंतर्गत दीड लाख रुपये कर्ज माफी मध्ये यादीत नाव आले. मात्र यावल सेंट्रल बँकेत नंबर चुकीचा अपलोड झाल्याने गिरडगाव (ता.यावल) येथील शेतकऱ्यास वारंवार चकरा माराव्या लागत असून शेतकऱ्याची अवहेलना होत असल्याच्या तक्रारी वाढ झाली असून लवकरात लवकर मला याबाबत न्याय न मिळाल्यास शेवटी आत्महत्या करण्याचा मला पसंत राहील असा इशारा गिरडगाव येथील मुरलीधर बळीराम पाटील यांनी दिला आहे.

गेल्यावर्षी कडक उन्हाळ्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोल झाली. अल्पशा पावसामुळे शेतकऱ्यांना शासनाने दीड लाख रुपये कर्ज माफी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतून दिली वारंवार कागदपत्र कांची पूर्तता तलाठी, कृषी पर्यवेक्षक यांच्याकडे देऊनही अद्यापपावेतो मला या योजनेचा लाभ मिळाला नाही.

तर यावल सेंट्रल बँकेत माझा खाते नंबर 22 21 64 69 47 हा असून मात्र त्याठिकाणी 31 49 46 59 33 असा चुकीने अपलोड झाला, याबाबत सहाय्यक निबंधक तसेच संबंधित बँक व्यवस्थापक आणि महसूल प्रशासन यांच्याकडे वारंवार फिरावे लागले तसेच यावर्षी अतिवृष्टीमुळे हातचा तोंडी आलेला घास देवाने हिरावून घेतला त्यात झालेले मोठे नुकसान हे न भरून निघणारे आहे.

यासाठी तहसीलदार प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतील रक्कम मला त्वरित मिळावी असा शेवटचा अर्ज आज दिनांक 1 नोव्हेंबर 19 रोजी मुरलीधर बळीराम पाटील राहणार गिरडगाव यांनी दिला असून मला लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास मी माझे जीवन संपवून घेईल माझ्या आत्महत्या प्रकरणी प्रशासनच जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी दिला आहे

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!