Type to search

जळगाव

न्हावीच्या उपसरपंचपदाची उद्या निवडणूक

Share

न्हावी तालुका यावल वार्ताहर- येथील ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सुनील चुडामण भोगे यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागी दिनांक 16 जुलै रोजी मंगळवार दुपारी दोन वाजता उपसरपंच पदाची निवडणूक लोकनियुक्त सरपंच सौ भारती चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात होत आहे.

या ग्रामपंचायतीवर 17 ग्रामपंचायत सदस्य असून 12 सदस्य भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे, 4 भारतीय जनता पक्षाचे, एक शिवसेनेचा आहे.बहुमत राष्ट्रीय काँग्रेसचे असल्यामुळे पाच वर्षात ज्येष्ठांना संधी मिळावी यासाठी प्रथम सुनील भोगे यांना मान मिळाला.यानंतर कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष आहे? तरी सर्वात आघाडीवर ज्येष्ठ ग्रा प सदस्य सतीश जंगले यांचे नाव आघाडीवर आहे. आणि सतीश वामन जंगले हेच उपसरपंच पदी विराजमान होतील असे विश्वसनीय वृत्त आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!