Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव

यावल : वीज मंडळाचा अजब कारभार : घरगुती वापराचे बील आले ३४ हजार

Share

यावल (प्रतिनिधी) –

शहरातील पितांबर बारकू सावकारे सर तिरुपती नगर यावल यांचे घरगुती वापराची विज बिल थातूरमातूर रेडींग टाकून गेल्या सहा महिन्यापासून असे होत असून या महिन्याचे बिल चक्क 34 हजार रुपये टॅक्ससह आल्याने यावल शहरात एकच चर्चेचा विषय बनलेला आहे

वीज मंडळातर्फे त्यांच्या घरी घरगुती वापर म्हणून वीज कनेक्शन घेण्यात आलेले आहे जून 2019 पासून त्यांना 134 युनिटचे बिल प्राप्त होत होते त्यांनी दोन-तीन वेळा ऑनलाइन तक्रारी दिल्या एक वेळ सुद्धा कार्यालयातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी तक्रारीचे निरसन केलेले नाही.

तक्रारीचे गेल्या सहा महिन्यापासून निवारण झाले नसून पूर्वीचे मीटर बिल सुस्थितीमध्ये असताना व कर्मचारी मिटर रिडींग घेऊन जात असताना सहा महिन्यापासून येकच रेडींग चे बिल प्राप्त झाले तसेच शंभरच्या पट्टी मध्ये आपल्या बिल आकारणी चे रक्कम ही बदलत असल्याने जास्त युनिटच्या पट्टीमध्ये जर जास्त रकमेची बिल प्राप्त झाली. तर त्याला जबाबदार कोण? त्यांना प्राप्त झालेल्या जून 2019 पासून ते आक्टोबर 19 पर्यंत मागील रिडींग चालू रीडिंग हे 24 हजार 492 आकडा दाखवतो म्हणजे वापराचे युनिट फक्त 134 युनिट वापरले गेलेले आहेत असे दाखवले गेलेले आहे.

तर जून 19 मध्ये नव्याने मीटर बसवण्यात आले, त्यात चालू रीडिंग शून्य व मागील रीडिंग शून्य दाखवण्यात आले होते युनिट वापर या महिन्यात 100 युनिट वापरल्याचे दाखवले गेले असून त्याचे बिल 630 एवढे भरणा सुद्धा केलेला आहे याबाबत कोणतीही कारवाई मंडळाकडून आजतगायत झालेली नाही नवीन मीटर मध्ये एकूण वापरलेले रीडिंग 772 असून यांना जून 19 ते ऑक्टोबर 19 पर्यंत 636 एवढेच वापरले गेलेले आहे.

 

मात्र वीज मंडळ आणि 136 युनिटचे बिल न देता 2483 युनिट चे वापराचे बिल दंडासह व विविध टॅक्स सह 33, 900 रुपये एवढे देण्यात आलेले आहे यांच्या घरांमध्ये नेमका वापर घरगुती वापर असल्याचा दावा पितांबर सावकारे यांनी केला असून वीज मंडळाचे कर्मचारी वापरही पाहून गेलेत मात्र वीज मंडळाचे अधिकारी ऑफिस सोडायला तयार नाही व तक्रारींचे निरसन करायलाही तयार नाहीत वीज मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे शहरात नव्याने बसवलेल्या मीटर स्थळी अनेकांचा असाच रोष आहे. वीज मंडळातर्फे नव्याने बसविण्यात आलेल्या मीटर बाबत संभ्रम निर्माण झाला असून वीज मंडळाच्या या भोंगळ कारभारामुळे यावल शहर वर्षे त्रस्त झालेले आहे नेमके कुंभकर्णी झोपेत असलेले वीज मंडळाचे अधिकारी आता तरी लक्ष देतील का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!