Type to search

जळगाव

भोरगाव लेवा पंचायतला पुस्तक भेट

Share

हंबर्डी, ता.यावल- यावल तालुक्यातील पाडळसा येथील लेवा पाटीदार समाजाची भोरगांव लेवा पंचायतीला सुमारे 250 वर्षापूर्वी स्थापना झाली आहे. लेवा समाजाची मातृसंस्था म्हणून ओळखली जाणारी व न्यायीक दर्जा प्राप्त झालेल्या भोरगांव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक रमेशदादा विठू पाटील याना व भोरगांव लेवा पंचायतला आपले हंबर्डी गाव पुस्तक सप्रेम भेट देण्यात आले.

या पुस्तकात हंबर्डी गावातील ग्रामस्थाच्या रूढी, परंपरा , धार्मिक, शौक्षणिक, कृषी, सामाजिक, सांस्कृतीक, नोकरदार वर्ग , उदोजक, डाँक्टर ,वकील, राजकीय या सह विविध व्यक्तीचा परिचय या पुस्तकात करून दिला आहे. पुढील पिढीला गावाबद्दलची १५६२ पासूनची संपूर्ण माहिती उपलब्ध करून ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला असल्याचे खेमचंद पाटील यांनी यावेळी सांगितले. कुटूंबनायक रमेशदादा पाटील, फिरके भाऊसाहेब, वाय.पी. बर्‍हाटे, रिटायर डे. पाटबंधारे अभियंता. सरला वारके याच्यासह पंचायतीचे सदस्य यांनी शुभेच्छा देऊन स्वागत केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!