यावल शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच ; ७४ हजाराच्या रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

jalgaon-digital
2 Min Read

यावल (प्रतिनिधी)

येथे शहरात चोरट्यांनी सुन्या घरांच्या कडी कोंड्याला कुलूप दिसताच कुलूप तोडून चोरी करण्याचा सपाटा सुरूच ठेवलेला असून व्यास नगरातील एका इसमाकडे घराचे कुलूप व कडीकोंडा तोडून 74 हजार रुपये व सोन्याचे दागिने लांबवले.

तर जुन्या वसाहतीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलचे पाठीमागे पुर्वेकडील बाजूस गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी चार घरे फुटली होती. पुन्हा दि.10 जानेवारी 20 ते 12 जानेवारी दरम्यान जमील अब्दुल पिंजारी राहणार व्यास नगर यावल जिल्हा जळगाव ये हज यात्रेसाठी गेलेले होते.

त्यांची पत्नी निलोफर पिंजारी हीने मला माहेरी चोपडा येथे जायचे आहे माझा भाऊ घरी आलेला आहे मी चोपडा येथे जाऊन येते असे सांगितले त्यावरून निलोफर पिंजारी या भावासोबत चोपडा येथे 10 जानेवारी 20 चे संध्याकाळी चार वाजेला निघून गेल्यात व त्यांच्या घराचा कळी कोंडा कुलूप लावलेला आहे याचा आणि थंडीचा फायदा घेऊन सुनाट वातावरणाचा चोरट्यांनी या घराचे कुलूप तोडून प्रवेश करून 59 हजार दोनशे रुपयाची सोन्याच्या 40 ग्रॅम च्या पाटल्या व दहा ग्रॅमची पोत असे 74 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविली.

घरातील अलमारीतील व संसारोपयोगी साहित्याची नासधूस चोरट्यांनी केलेली दिसली. याबाबत निलोफर पिंजारी या 12 जानेवारी रोजी घरी आल्या असता त्यांच्या घराच्या कडी कोंड्याची कुलूप तोडून चोरी झाल्याचे दिसून आले व पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिसांनी या ठिकाणी येऊन पंचनामा केला.

यावल पोलीस स्टेशनला याबाबत भाग 5 गुरव नंबर  11-20 भादंवि कलम 380, 457, 454 नुसार दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक यावल अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुनिता कोळपकर या करीत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *