Type to search

जळगाव

जलयुक्त शिवार योजने अंतर्गत नाला खोलीकरणाच्या जलसाठ्याचे पूजन

Share
चुंचाळे ता.यावल- येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत व जलयुक्त शिवार योजने अंतर्गत केलेल्या नाला खोलीकरणात पाणी साठ्याचे जलपुजन जलशक्ती आभियानाचे केंद्रयीय सह सचिव तथा संचालक संजय सिंन्हा यांच्या हस्ते झालेल्या जलसाठ्याचे पुजन करण्यात आले तर श्रीफळ बोराळे उपसरपंच उज्जैनसिंग राजपुत यांच्या हस्ते वाहण्यात आले.
चुंचाळे ग्रामस्थ व पत्रकार यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक २० रोजी जलपुजन व श्रीफळ वाहण्याचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते गेल्या चार ते पाच वर्षापासून नदीला पुर आला नव्हता मात्र अचानक झालेल्या मुसळधार पाऊसामुळे नद्या नाल्यांना पुर आले पुराने जलयुक्त शिवार योजने अंतर्गत व चुंचाळे ग्रामस्थांच्या लोकसहभागातुन पाणी आडवा पाणी जिरवा मोहिमेतुन नदीपात्रात जागो जागी  नालाखोलीकरण करण्यात आले होते व काल झालेल्या पावसात ते तुंडूब भरुन वाहत असताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आंनद गगणात मावेना असा पहायला मिळत होता गाव पाणीदार झाल्याने कृषीविभागाचे अधिकारी व ग्रामस्थयांचे कौतुक होत आहे

.

जमिनीत पाणी जिरल्याने विहरी टुबेलांना पाणी साठा वाढुन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटुन भविष्यात याचा फायदा चुंचाळे नागरीकांना होणार आहे यावेळी जलशक्ती अभियानाचे केंद्रीय सहसचिव संजय सिन्हा,भारत सरकार उपसंचालक जळगाव अनिल भोकर,उपविभागीय कृषीअधिकारी बोराडे साहेब,रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी प्रसाद मते,तालुका कृषीअधिकारी व्हि.एल.तळले,यावल प.स.गटविकास अधिकारी सपकाळे,मंडळ कृषी अधिकारी किनगाव एम.एफ.पाटील,प.स.यावल रो.ह.यो.चे ए.टी.ओ.जितेद्र मोरे, कृषी पर्यवेक्षक एम.डी.पाटील,कृषी सहाय्यक व्हि.व्ही.बारी,साकळी येथील प्रगतीशिल शेतकरी श्यामकांत वसंत महाजन,बोराळे उपसरपंच उज्जैनसिंग राजपुत,श्री सुनिल नेवे एकता फाऊंडेशन चे अध्यक्ष व यावल देखरेख संघाचे संचालक सुनिल नेवे, चुंचाळे ग्राम पंचायत सरपंचपती संजय पाटील,माजी ग्रा.प.सदस्य विठ्ठल राजपुत,शेतकरी सुपडू तडवी साकळी येथुन आलेले श्यामकांत महाजन चंद्रकांत नेवे किरण महाजन जेष्ठ पत्रकार के.बी.खान यांच्या सह मोठ्या संख्येने शेतकरी व पत्रकार बांधव उपस्थित होते.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!