Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

राफेल प्रकरण: यशवंत सिन्हा, अरूण शौरींकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका

Share
नवी दिल्ली: राफेल करार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला क्लीन चिट दिल्यानंतरही हा वाद शमण्याची चिन्हे नाहीत. सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, यासाठी माजी मंत्री यशवंत सिन्हा व अरुण शौरी यांच्यासह प्रसिद्ध विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी याचिका दाखल केली आहे.

राफेल व्यवहारात कोणतीही अनियमितता आढळली नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने १४ डिसेंबरला आपल्या निर्णयात स्पष्ट केले होते. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने राफेल व्यवहार देशासाठी आवश्यक असल्याचे सांगत सर्व याचिका फेटाळल्या होत्या. न्यायालयाचा हा निर्णय काँग्रेससाठी धक्का असल्याचे बोलले गेले. कारण विरोधी पक्ष या मुद्यावरून सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात होते. मोदी सरकारने यूपीएच्या तुलनेत तीन पट अधिक रक्कम देऊन राफेल करार केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.

‘राफेल करारावर न्यायालयानं दिलेल्या निर्णयामध्ये अनेक त्रुटी आहेत. हा निर्णय सरकारनं न्यायालयात दिलेल्या चुकीच्या माहितीवर आधारलेला आहे. ही माहिती सरकारनं कुणाच्याही सही शिक्क्याशिवाय बंद लिफाफ्यात सादर केली होती. हा नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचा भंग आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे,’ असं पुनर्विचार याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!