Xiaomi Mi A2 चा सेल दुपारी १२ वाजता सुरु होणार

0
नवी दिल्ली : चिनी मोबाईल कंपनीने आपले नवीन मॉडेल Xiaomi Mi A2 लॉन्च केला आहे. ग्राहकांना हा फोन गुरुवार (दि.१६ ऑगस्ट) रोजी दुपारी 12 वाजता विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. MI वेबसाईट आणि त्यांचे अधिकृत ऑनलाईन विक्रेत्याकडे या फोनची खरेदी करता येणार आहे. Mi A2 हा गेल्या वर्षी लाँच केलेल्या Mi A1 या फोनचे अपडेटेड व्हर्जन आहे.फोन काळा, सोनेरी, निळा आणि रोज गोल्ड रंगामध्ये उपलब्ध आहे. कॅमेराच्या आधुनिकतेमुळे व गुणवैशिष्टामुळे Mi A1 हा ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरला होता.

शाओमी कंपनीने Mi A2 हा भारतात लाँच केला. Mi A2 मध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी रोम स्टोरेज स्पेस उपलब्ध आहे. दुसऱ्या व्हेरिअंटमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज स्पेस आहे. ४ जीबीच्या फोनची किंमत १६,९९९ ठेवण्यात आली आहे, तर ६ जीबीच्या फोनची किंमत अद्याप कंपनीने जाहीर केलेली नाही. या फोनमध्ये 5.99 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले 205 डी कर्व्ह ग्लास सोबत असणार आहे. क्वालकॉम ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर दिला आहे. तो 1.8 गीगाहर्ट्झ एवढ्या वेगाने चालतो. ग्राफिक्ससाठी 512 जीपीयू देण्यात आला आहे.

मोबाईल मध्ये 20 आणि 12 असा ड्युएल मेगापिक्सल कँमेरा देण्यात आला आहे.तसेच सेल्फी कॅमेरा 20 मेगापिक्सल अपर्चर एफ/1.75 सोबत देण्यात आला आहे. सेल्फीसाठी सॉफ्ट एलईडी फ्लॅश आणि सोनी IMX376 सेंसर वापरण्यात आला आहे. दोन्ही कॅमेरा एआय फिचरने संपन्न आहेत. फोनमध्ये 8.1 ओरियो ही प्रणाली वापरण्यात आली आहे. फिंगरप्रिंट स्कॅनर, फेस अनलॉक सारख्या सुरक्षेच्या सुविधाही आहेत. तसेच या फोनची बॅटरी 3010 एमएएच एवढी आहे. जी साधारण दिवसभर चालू शकते.

LEAVE A REPLY

*