LOADING

Type to search

खुशखबर : रेडमी नोट 7 आणि रेडमी नोट 7 प्रो भारतात लॉन्च

आवर्जून वाचाच टेक्नोदूत मार्केट बझ मुख्य बातम्या

खुशखबर : रेडमी नोट 7 आणि रेडमी नोट 7 प्रो भारतात लॉन्च

Share
नवी दिल्ली : 48 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असलेला Redmi Note 7 हा स्मार्टफोन अखेर आज भारतात लाँच होणार आहे. कंपनीने गेल्या महिन्यात हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला होता. चीनची कंपनी शाओमीची नवी सब-ब्रँड कंपनी Redmi ने हा फोन सादर केलाय.
नव्या Redmi मालिकेची सुरूवात Redmi Note 7 द्वारा झाली आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूला 48 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचे कॅमेरे आहेत. तर सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूला 13 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलाय. या स्मार्टफोनमध्ये AI फीचर्स आणि पोट्रेट मोड आहे. रेडमी नोट 7 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसरसह अँन्ड्रॉइड 8.1 ओरियोवर कार्यरत असेल.

‘रेडमी नोट 7’ 9,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. तर ‘रेडमी नोट 7 प्रो’ची किंमत 13,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ‘रेडमी नोट 7’ ची विक्री 6 मार्चपासून होणार असून ‘रेडमी नोट 7 प्रो’ची विक्री 13 मार्चपासून सुरु होईल. ग्राहकांना शाओमीच्या वेबसाईटसह फ्लिपकार्टवरही हा फोन खरेदी करता येणार आहे.

Redmi Note 7 हा भारतात 3GB रॅम, 32GB स्टोअरेज (9,999 रुपये) आणि 4GB रॅम, 64GB स्टोअरेज (11,999 रुपये) या दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. अशाचप्रकारे Redmi Note 7 Pro देखील 4GB, रॅम, 64GB स्टोअरेज (13,999 रुपये) आणि 6GB रॅम, 128GB स्टोअरेज (16,999 रुपये) या दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे.

Redmi Note 7

Camera : 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, पोर्ट्रेट शॉट्स क्लिक करण्यासाठी 2 मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा, 13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा. एआय फेस अनलॉक, एआय स्मार्ट ब्युटी आणि एआय सिंगल शॉट ब्लर फीचर. लो लाईट फोटोग्राफीसाठी नाईट मोड
Resoulation : 1080X2340
Display : 6.30 इंच फूल एचडी प्लस एलटीपीए, कॉर्निंग गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शन
Ram : 6GB पर्यंत रॅम
Storage : 64GB पर्यंत स्टोअरेज
Processor : क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर
Battery : 4,000mAh, क्विक चार्ज 4 सपोर्ट

Redmi Note 7 Pro

‘रेडमी नोट 7 प्रो’ देखील दिसायला जवळपास ‘रेडमी नोट 7’ सारखाच आहे. म्हणजेच ‘रेडमी नोट 7 प्रो’मध्येही ग्रेडिएंट फिनिशिंग, फंकी कलर्स आणि वॉटरड्रॉप नॉच मिळणार आहे. या स्मार्टफोनच्या रिअरमध्येही दोन कॅमेरे आणि फ्रंटला एक कॅमेरा देण्यात आला आहे.

Camera : रिअरमध्ये f/1.8 अपार्चरसोबत 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि पोर्ट्रेट शॉट्स क्लिक करण्यासाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रंटला 13 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच फेस अनलॉकचाही ऑप्शन दिला आहे. तर लो-लाईट फोटोग्राफीसाठी नाईट-मोड मिळेल.
Resoulation : 1080×2340
Display : 6.3 इंच फूल एचडी प्लस एलटीपीएस, स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5,
Processor : क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसर
Ram : 6GB
Storage : 128GB
Battery : 4,000mAh, क्विक चार्ज 4 सपोर्ट

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!