#WWC17 : भारतीय महिला संघाची विश्वचषकात विजयी सलामी

0
कर्णधार मिताली राजने (७१) विश्वविक्रमी अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघाला महिलांच्या विश्वचषक स्पर्धेत शानदार विजय मिळवून दिला.
तिने ४४ वर्षांच्या इतिहासात हा विक्रम केला. भारताने सलामीच्या सामन्यात शनिवारी‌ तीन वेळच्या चॅम्पियन इंग्लंडवर मात केली.
भारताने ४७.३ षटकांत ३५ धावांनी सलामीचा सामना जिंकला. या विजयाने गत उपविजेत्या भारताने स्पर्धेतील अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. अाता भारताचा दुसरा सामना गुरुवारी विंडीजशी हाेईल.
महाराष्ट्राची युवा खेळाडू स्मृती मंधना (९०), पूनम राऊत (८६) अाणि कर्णधार मिताली राजने (७१) झंझावाती खेळी केली. त्यामुळे भारतीय संघाला पहिल्या सामन्यात यजमान इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ३ बाद २८१ धावांचा डाेंगर रचता अाला.
प्रत्युत्तरात इंग्लंडने ४७.३ षटकांत अवघ्या २४६ धावांमध्ये गाशा गुंडाळला. इंग्लंडकडून विल्सनने सर्वाधिक ८१ धावांची खेळी केली. मात्र, तिला पराभव टाळता अाला नाही. युवा गाेलंदाज दीप्ती शर्माने सर्वाधिक तीन अाणि शिखा पांडेने दाेन विकेट घेऊन भारताचा विजय निश्चित केला.

LEAVE A REPLY

*