कुस्ती संघाच्या प्रशिक्षकपदी शबनम शेख

0
राहुरी स्टेशन (वार्ताहर) – अहमदनगर जिल्ह्याचे भूषण असलेली सुवर्णकन्या शबनम शेख हिची महाराष्ट्र राज्य पुरुष व महिला कुस्ती संघाची प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

62 वी सिनिअर नॅशनल रेसलिंग चॅम्पियनशीप आणि 20 वी सिनिअर फिमेल नॅशनल रेसलिंग चॅम्पियनशीप 2017 स्पर्धेसाठी निवडलेल्या महाराष्ट्र पुरुष व महिला कुस्ती संघाच्या कुस्तीपटू खेळाडूंसाठी प्रशिक्षक म्हणून शेख हिची निवड झाली असून ती पटियाला येथे एनआयएस कोच ‘ए’ ग्रेडमध्ये उत्तीर्ण होणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे.

सलग आठवेळा राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून सुवर्णकन्या होण्याचा मान तिने प्राप्त केलेला असून साईकेसरी, लातूर केसरी, कर्नाटक केसरीचा बहुमान तिने मिळविला आहे.

आतापर्यंत शबनम हिस राज्यभरातून अनेक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आलेले आहे. ऑलम्पिकमध्ये खेळून देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचा तिचा मानस आहे.

ती कर्जत तालुक्यातील आंबी जळगाव येथील सेवानिवृत्त लष्करी जवान शब्बीर शेख यांची कन्या असून राहुरी तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मुखतार सय्यद यांची भाची आहे. या निवडीबद्दल तिचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

*