बालदिनी आदिवासी मुलांसाठी ‘वॉव’ उपक्रम

0
त्र्यंबकेश्वर । समाजाप्रति ऋण व्यक्त करण्यासाठी, आदिवासी दुर्गम भागात मानवतेचे व्रत अंगीकारलेली तसेच महिलांच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी ‘वूमन ऑफ विझडम् फाऊंडेशन अर्थात ‘वॉव’ संस्थेतर्फे बालदिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषद डिजिटल शाळा, गावठा येथे विद्याथ्यार्ंंना शालेय साहित्य वाटप करण्यात आलेे.

‘वॉव’ संस्थेतर्फे मुलांसाठी लेखन साहित्य, दप्तर, खाऊ, कंंपास पेट्या, खाद्य पदार्थ इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रारंभी संदीप गीते यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी मुलींनी स्वागत गीत, भू्रणहत्या विरोधी गीत सादर केले. वैयक्तिक स्वच्छता व आरोग्य हा शिक्षणांप्रमाणे बालकाचा एक मूलभूत अधिकार आहे.

‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’ या कार्यक्रमातून मुलांना रोज हात धुण्याची सवय लागावी यासाठी संदीप गीते, शाळेचे मुख्याध्यापक आणि ‘वॉव’फाऊंडेशन यांच्या संयुक्त सहकार्यातून मुलांसाठी ‘हॅण्ड वॉश स्टेशन, वर्षभर पुरेल इतका लिक्विड साबण, टॉवेल आदी वस्तू देऊन तालुक्यातील पहिले परिपूर्ण ‘हॅण्ड वॉश स्टेशन’ तयार करण्यात आले.

गरीब महिला, पुरुषांना मायेची उब मिळावी, या उद्देशाने उबदार कपड्यांचेही यावेळी वाटप करण्यात आले. संस्थेच्या सदस्यांनी या उपक्रमात भाग घेतला. मुलांसाठीचा हा उपक्रम म्हणजे बाल आनंद मेळावाच ठरला. यावेळी उपाध्यक्ष रेखा रेवरे, विद्या मुळाने, अंजू गंगावणे, वैशाली गुप्ता, भारती वाघ, रेणू वाढणे, दर्शनी अंबेकर, शीतल बागले, कलमकर, स्मिता पाटील, उज्ज्वला बोधले, सपना बुटे, सुरेखा बोडके, करुणा बागडे, क्रांती न्याहारकर यांच्यासह गावाचे संरपच, सदस्य, शिक्षकवृंद यांची उपस्थिती होती.

सामूहिक प्रयत्नातून समाजकार्य : ‘वॉव’ फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांचा या कार्यात मोलाच वाटा असून सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून मुलांसाठी चांगला उपक्रम करण्यात आला. आजपर्यत ज्या भागात एकही सेवाभावी संस्था पोहोचली नाही तिथे आमच्या संस्थेतर्फे खर्‍यां गरजवंताना मदत मिळाली याचा आनंद होत आहे.
– अश्विनी न्याहरकर, ‘वॉव’ सदस्या.

LEAVE A REPLY

*