युवा दिनविशेष : २३ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात ‘ती’ झाली दुय्यम निरीक्षक

0
नमिरा पिरजादे  | 
नुकताच राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दुय्यम निरीक्षक पदाचा निकाला जाहीर झाला आहे. या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात चंद्रपूर जिल्ह्यातील सृष्टी भागवत या विद्यार्थिनीने अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. तिचे सर्वत्र कौतुक केले जात असून लवकरच सृष्टी राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक म्हणून काम बघेल. आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवा पिढीला प्रेरणा मिळावी या हेतूने तिच्याशी केलेली खास बातचीत….

माझे नाव सृष्टी दिलीप भागवत. राहणार बिंबाड, तालुका:मूळ, जिल्हा:चंद्रपूर. शिक्षण : बीई इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन. घरची परिस्थिती बेताचीच. आधीपासूनच अधिकारी बनण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल सुरु होती. जेव्हा अभियांत्रिकीचे शिक्षण सुरु होते तेव्हा, मी स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरवले. जेव्हा ठरवलं तेव्हा अनेकांनी या परीक्षा अवघड असतात वगैरे वगैरे सांगितले होते. मनात भीती होतीच पण कुठल्याची परिस्थितीत मागे हटायचे नव्हते. मी ताबडतोब निर्णय घेतला आणि पुण्यात स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली.

या क्षेत्रात येणाऱ्या बहुतांश विद्यार्थांनचा प्रवास 3 ते 5 वर्षांची असतो. पण माझा प्रवास खुप कमी दिवसांचा आहे. फ़क्त 12 महिन्याच्या प्रवासात मी खुप काही आनुभवले, या क्षेत्रात आल्यावर कोणालाही पहिले सहा महिने अभ्यास काय करायचा हे कळत नसते मात्र घरातच वडील शिक्षक असल्यामुळे मी ही त्याला अपवाद नव्हते.

पहिले सहा महीने काय करायच कसा अभ्यास करायचा हे मला ही माहित नव्हते, पण जेव्हा अभ्यास सुरु केला, तेव्हा स्पर्धा परीक्षांमधील बारकावे समजून घेण्यावर मी भर दिला. मी 2017 ला दिलेली प्रत्येक परीक्षा माझ्यासाठी पहिलीच होती. राज्यसेवेच्या परीक्षांपासून मी स्पर्धा परीक्षांना सामोरे गेले.

तेव्हापासून मी स्पर्धा परीक्षांचे आधी होऊन गेलेले पेपर बघत गेले त्यानंतर पेपर कशाप्रकारे रचण्यात आला आहे हेदेखील बघितले. पेपरमध्ये आलेले प्रश्न यांचा मी सध्याच्या ताज्या घडामोडींशी काय संबंध याचा मी तौलनिक अभ्यास केला.

त्यानंतर मी माझ्या पहिल्या प्रयत्नात मी दोनदा पोलीस उपनिरीक्षक पूर्व आणि मुख्य, राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक पूर्व आणि मुख्य परीक्षा, वनसेवा पूर्व परीक्षा एकाच वर्षात या सर्व परीक्षा मी उत्तीर्ण झाले.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात मी अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गात मुलींमध्ये प्रथम आले तर राज्यात दुसरा क्रमांक मला मिळाला. 

जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण अभ्यास यांची सांगड घालत मी हे यश संपादन केले. सृष्टी म्हणते जितका जास्त वेळ तुम्ही अभ्यासासाठी आणि स्वतःला प्रेरित करण्यासाठी तितकाच कमी वेळ तुम्हाला प्रशासकीय नोकरी मिळावण्यासाठी लागेल.

मी एवढ्यावरच थांबणार नाही तर मला पुढे मला अजून वरिष्ठ श्रेणीच्या परीक्षा द्यावयाच्या आहेत. त्यासाठी मी आतापासूनच कसून अभ्यास करत आहे.

१० वेगवेगळे पुस्तके वाचून अभ्यासात गोंधळ निर्माण करू नका एकच पुस्तक आणि सोबत चांगला मार्गदर्शक तुमच्या पाठीशी असला तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

LEAVE A REPLY

*