Type to search

Breaking News Featured क्रीडा मुख्य बातम्या

सुपरमॉम मेरी कोम उपांत्य फेरीत दाखल; सुवर्णपदकाच्या आशा पल्लवित

Share

भारताची सुपरमॉम मेरी कोम दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तिच्या या कामगिरीने सुवर्णपदकाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

भारताची यशस्वी बॉक्सर मेरी कोमने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करताना भारतासाठी एक पदक निश्चित केले आहे.

मेरी कोमने उपांत्यपूर्व फेरीत रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या इंग्रीट व्हॅलेन्सियाला 5-0 असे सहज नमवत दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला.

मेरीचे हे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील आठवे पदक ठरले आहे. मेरीने यापूर्वी जागतिक स्पर्धेत सहा सुवर्णपदकं आणि एक रौप्यपदक जिंकले आहे.

उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना मेरी कोमनं थायलंडच्या जुटामास जिटपोंग हिचा ५-० असा धुव्वा उडवला होता. जागतिक स्पर्धेत आठ पदकं जिंकणारी मेरी ही पहिली व एकमेव महिला बॉक्सर आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!