Type to search

Breaking News ब्लॉग मुख्य बातम्या

Blog : जागतिक तंबाखू विरोधी दिन : तंबाखू हद्दपार करा!

Share

व्यसन कोणत्याही आमलीपदार्थाचे असो शेवटी ते जिवनाला संपवण्या करीताच असते. तंबाखू ही यापैंकीच एक आहे. तंबाखू एक हळूवार परीणाम करणारा जिवघेणा विष आहे.

जे प्राशन करण्याह्या माणसाला हळू-हळू मृत्यूच्या घशात ओढत नेते. लोकं कळत नकळत तंबाखूच्या उत्पादांचे सेवन करतात व नंतर हीच सवय रोजची लतमधे बदलते तेव्हा नशा आनंदापोटी नसून इच्छा नसतांना सुद्धा केला जातो. समाजात तंबाखू सहजपणे उपलब्ध होनारे व्यसन आहे.

लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेच वयोगटाचे लोकं तंबाखुचा आहारी गेलेले आढळतात. नेहमीच पानटपरीच्या दूकानात लहान मुले -विद्यार्थी दिसून पडतात. आपल्या राज्यात तर तंबाखूचा खर्रा मोठ्याप्रमाणावर खाल्ला जातो. या व्यसनात अशिक्षितांबरोबर शिक्षित लोकांचा ही मोठा सहभाग आहे. शासनाने तर सर्वप्रकारच्या आम्लीपदार्थांवर संपुर्णपणे बंदी घालायला हवी.

तंबाखूचा पुष्कळशा स्वरूपात वापर होतो, जसे की बीडी, सिगरेट, गुटखा, खर्रा, हुक्का, चिलम व इतर. धुंआरहीत तंबाखू- तंबाखाच पान, पान मसाला, तंबाखू सुपारी चुन्याच मिश्रण, मैनपुरी तंबाखू, मावा, खैनी, सनस, मिश्री, गुल, बज्जर, गुढाकू, क्रीम तंबाखू पावडर, तंबाखूयुक्त पाणी व इतर. आजच्या आधुनिक काळात हुक्कापार्लर खूप प्रचलित झाले आहेत. रेव पार्टीचा व इतर पार्टीचा नावावर खूप मोठ्याप्रमाणात युवकांद्वारे नशा केला जातो.

आजच्या दिवसाच महत्व

विश्व स्वास्थ संगठनातील सदस्यांच्या सर्वसम्मती निर्णयानंतर 31 मे 1988 पासुन या दिवसाला विश्व तंबाखू निषेध दिवसाच्या रूपाने साजरा करण्याचे ठरविण्यात आले. याचा उद्देश म्हणजे तंबाखुचे दुष्परीणाम लोकांचा समोर आणने, जनजागृती करणे, लोकांच्या स्वास्थ समस्येवर वैश्विक लक्ष्य वेधणे असा आहे. डब्ल्यूएचओ द्वारे 31 मई 2008 ला सर्वप्रकारचा तंबाखू उत्पादांचा वस्तुंच्या जाहिरातींवर प्रतिबंध घालण्यात आलेले आहे. दरवर्षी या तंबाखू निषेध दिवसाला एका नविन विषयासोबत साजरा करण्यात येतो. तसेच अंतराष्ट्रिय धुम्रपान निषेध आठवडा 25 मे ते 31 मे पर्यंत साजरा केला जातो.

तंबाखूमुळे निर्मीत स्थिती

तंबाखूच्या उपभोक्त्यांमधे संपुर्ण विश्वातून भारत देशाचा दुसरा क्रंमांक (27.5 कोटी लोकसंख्या) येतो, जगात दर 6 सेकंदाला एक मरण तंबाखू मुळे होते, एक सिगरेट मुळे जीवनातील 11 मिनीटे कमी होतात, भारतात रोज 2739 लोकं तंबाखूमुळे आपला जिव गमावतात. जगभरात 70 लाखाहून ज्यास्त लोकसंख्या दरवर्र्षी तंबाखूमुळे आपले जीवन संपवतात यातुन कमीतकमी 10 लाख पेक्षा जास्त लोकं भारतातुन दरवर्षी तंबाखू संबंधीत आजारामुळे मृत्यूमुखी पडतात.

ज्यात 72 टक्के लोकं फक्त राजस्थान राज्याचे आहेत, 48 टक्के पुरूष व 20 टक्के महिला तंबाखूचे सेवन करतात. तंबाखूच्या बाजारात 48 टक्केवारी बिडी, 38 टक्केवारी तंबाखू, 14 टक्के सीगरेट आहे. यात मृत्यूचे प्रमाण बिडीमुळे ज्यास्त वाढलेल दिसून येते. जे लोकं सीगरेट बिडी पीत नाही पण त्याचा विषारी धुराचा संर्पकात येतात ती लोकंसुद्धा तंबाखाचा दूष्परीणामाला मोठ्या संख्येने बळी पळतात. अशाकारणांमुळे शासनाला स्वास्थसेवेवर ज्यास्त निधी खर्च करावा लागतो. राजस्थान मधे सर्वेप्रकारचा तंबाखू उत्पादांवर 65टक्के कर आकारण्यात आलेला आहे. 2 आॅक्टोंबर 2008 ला सार्वजनिक जागेवर धुम्रपान निषेध कायदा लागू करण्यात आला. शासनाने जर तंबाखूवर संपुर्ण बंदी घातली तर कॅन्सर सारख्या कित्येक गंभीर आजारांवर 80-90 टक्के कमतरता येईल.

 

तंबाखूमूळे होणारे गंभीर वाईट परीणाम

 • तंबाखूमधे उत्तेजना व मादकता वाढविणारा मुख्य घटक निकोटिन असतो, हाच सर्वातजास्त घातक आहे. आणि नाइट्रोसामाइन्स, बेन्जोपाइरीन्स, आर्सेनिक, क्रोमीयम इतर विषारी तत्वे असते.
 • कैंसर उत्पन्न करणारी तत्वे या तंबाखूमधे असते, जसे की फेफडे, तोंडाचे, गळा, पोट, गुर्दे, मुत्राशय, अग्नाशय, यकृतचे कैंसर व इतर.
 • हार्ट डिसीज- हार्टअटैक, ह्नदय आजार, छातीत जडजड, दुखंन, स्ट्रोक एंजाइना.
 • इतर आजार- गैगरीन, ब्रेन अटैक, क्रोनीक ब्रोकाईटिल, निमोनीया, दातांचे मसूड्यांचे आजार, उच्च रक्तचाप, अवसाद, तोंडाचा वास, लकवा, अल्सर, दमा, महिलांना गर्भपात व असामान्य मुलांचा जन्म होणे.
 • गंभीर आजारामुळे तंबाखुला ”ए श्रेणीचा” दर्जा प्राप्त झालाय.
 • धुम्रपानामुळे वातावरणात जे दुषीत वायु बनते त्यात 4000 रसायन असतात.
 • शासनाला तंबाखु सिगरेट इतर वस्तुंचा विक्री मुळे जे राजस्व प्राप्त होते त्यापेक्षा अधिक राशी तंबाखुमुळे निर्मीत होणाऱ्या आजाराचा उपचारावर खर्च होतो.
 • धुम्रपान करणाîा व्यक्तीच्या संर्पकात येउन चांगल्या व्यक्तीचे स्वास्थ सु़द्धा खराब होते.

 

तंबाखू सोडविण्याकरीता काही उपाय

शासनातर्फे जिल्हा राज्य राष्ट्रिय स्तरांवर तंबाखू नियंत्रण प्रकोष्ट कार्यक्रम चालवली जातात. राष्ट्रिय स्वास्थ मिशन द्वारे तंबाखूमुळे होणाîा आजारांवर उपचार व तंबाखू नियंत्रण कार्यक्रम केली जातात. शासनाने ”सिगरेट व इतर तंबाखू उत्पाद अधिनियम 2003“ व ”खाद्य सुरक्षा व मानक अधिनियम 2006“ लावले आहे.

 • शैक्षणिक पाठ्यक्रमात तंबाखूच्या दुष्प्रभावाबद्दल प्रचार केले पाहीजे.
 • कैंसर पिडीत पेशंटनी जेवणात एंटीआॅक्सीडेंट युक्त फळे, भाज्या, फाइबरयुक्त रेशेदार आहार, मौसमी फळांचे सेवन करणे गरजेचे आहे.
 • तंबाखाचे व्यसन सोडण्याकरीता सर्वात महत्वाचे म्हणजे मजबुत इच्छाशक्तीची गरज असते, निकोटीन च्यूंगम, निकोटीन टैबलेटचे वापर तंबाखूची लत सोडवण्याकरीता डाॅक्टराच्या सल्ला द्वारे घेता येते.
 • व्यसनाधीन मित्रमंळडी पासून दुर राहावे, नेहमी र्निवसनी लोकांचा सहवासात रहावे. परीवार व मित्रांचा साथ खूप गरजेचा असतो.
 • नेहमी सकारात्मक विचार करावा व आपला वेळ योग्य ठिकाणी वापरावा.
 • रोज योगा प्राणायाम व्यायाम करावा, तनावमुक्त जिवन जगण्याचा प्रयत्न करावा.

शासनाने कितीही कर आकारले तरी व्यसनी व्यक्ती आपली लत सोडत नाही जो पर्यंत माणसाला स्वतांचा जिवाची व आपल्या परीवाराची काळजी समझणार नाही म्हणुन नशेचा आहारी न जाता नेहमी त्यापासून दुरच राहावे व दुसîांना सुद्धा नशेचा मुक्ततेसाठी परावृत्त करावे. तंबाखूच्या व्यसनापासून मुक्तते व रोकथाम करीता प्रशासकीय व खाजगी हाॅस्पिटल, पुनर्वास केंद्र द्वारे व्यसनाधीन व्यक्तींवर शारिरीक आणी मानसिक उपचार केले जातात.

सरकार आणी पूष्कळशा एन.जी.ओ. द्वारे राज्यीय राष्ट्रिय अंतराष्ट्रिय स्तरावर नशमुक्ती सप्ताह, नशामुक्ती दिवस, निषेध दिवस, कार्यक्रमे, संगोष्टि, चर्चासत्रे, नुक्कड नाटके, पथ नाट्ये, चडवळीणे समाजात तंबाखूच्या व इतर नशेसंबंधीत वस्तुंचा विरोधात जन-जागृती आणली जाते. आजच्या आधुनिक युगात तर सोशल मिडीयाचा छान वापर समाजात जनजागृती करीता करता येतो.

तंबाखू व धुम्रपान सोडवण्याकरीता पर्याय

तंबाखूचा पर्यायाच्या रूपात शरीराला हेल्दी अशी वस्तु घेता येते जसे सौफ, ड्राई फ्रुटचे चुर्ण तैयार करूण ठेवावे. जेव्हा केव्हा तंबाखूची तलब आली की हे थोडेसे चुर्ण तंबाखूचा ऐवजी तोंडात ठेवावे. या मुळे तलब हळूहळू कमी व्हायला लागते आणी तंबाखूचा व्यसनापासून सुटका होते. तंबाखू निषेध दिवसाच्या निमीत्याने आपण सगळे एक संकल्प घेऊया की कधीच आपण नशा करणार नाही आणि दूसîा लोकांना सुद्धा नशेपासुन दूर राहण्यास प्रेरीत करूया.

प्रा. डाॅ. प्रितम भि. गेडाम, दूरध्वनी क्र. 091 82374 17041

prit00786@gmail.com 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!