जागतिक छायाचित्र दिन विशेष फोटोगॅलरी; एकदा बघाच
Share

नाशिक | प्रतिनिधी
आज जागतिक छायाचित्र दिन. स्मार्टफोन घराघरांत पोहोचल्यानंतर प्रत्येकजण आता फोटोग्राफी नकळतपणे शिकले आहेत. जगातील प्रत्येक कोपर्यात राहणारा व्यक्ती १९ ऑगस्टची आतुरतेने वाट पाहत आसतो.
जागतिक छायाचित्र दिवसाचा हेतू लोकांच्या कल्पनांना वाव देणे त्यांना फोतोंच्या माध्यमातून संधी देणे तसेच या क्षेत्रात योगदान देण्यासाठी प्रोत्साहन देणे व लोकांच्या कामाचा प्रसार करण्यासाठी ज्या लोकांनी जगासाठी आपले विचार व्यक्त करतात.
देशातील विभिन्न संस्कृतीचे लोक यानिमित्त एकत्र यावेत व फोटो प्रदर्शन, स्पर्धा, व्याख्याने, कार्यशाळा याचे आयोजन केले जाते. असाच एक उपक्रम दैनिक देशदूतने आज हौशी छायाचित्रकारांसाठी मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
असा आहे इतिहास
जागतिक छायाचित्र दिनाचा इतिहास सुमारे पावणे दोनशे वर्षांचा असल्याचे सांगितले जाते. फ्रान्समध्ये सर्वप्रथम हा दिवस साजरी करण्यात आला. येथीलच लुईस द गेरो आणि जोसेफ नायफोर यांनी १८३७ मध्ये दगेरोटाईप या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचा शोध लावला.
इथूनच खऱ्या अर्थाने छायाचित्रणाला वाव मिळाला. वस्तू प्रकाश आणि अंधाराचा खेळ यामुळे बदलतात. या साध्या तत्त्वातून साधारण सन १८०० मध्ये कॅमेरा ही कल्पना विचारात आली.
काळानुसार या फोटोग्राफीत सुधारणा होत गेली. मोबाईलचे युग आले. जगभरातल्या फोटोग्राफर्सनी १९ ऑगस्ट २०१० रोजी पहिला जागतिक छायाचित्र दिवस आयोजित केला.
जगभरातून २७० फोटोग्राफर्सनी यामध्ये भाग घेतला. त्यांचे छायाचित्रे तब्बल १०० देशांमधल्या लोकांनी पाहिले. त्यानंतर दरवर्षी १९ ऑगस्ट हा जागतिक छायाचित्र दिवस म्हणून साजरा होऊ लागला.
देशदूतच्या आवाहनानंतर आलेले निवडक छायाचित्रे
नाशिकचे छायाचित्रकार सिद्धार्थ क्षत्रिय यांनी काढलेले काही आकर्षक छायाचित्रे…
देशदूतचे प्रतिनिधी अभिषेक विभांडीक यांचे मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केलेले आकर्षक फोटो
आदित्य समेल यांनी पाठवलेले काही आकर्षक फोटो