Type to search

ब्लॉग मुख्य बातम्या

जागतिक मानवता दिवस विशेष : कुठे हरवत चालली माणूसकी?

Share

आज आपण आधुनिक काळात वावरतोय. जगात प्रत्येक क्षेत्रात भरभरून प्रगती झाली आहे. सगळीकडे यांत्रिकी संसाधनांचा बाजार दिसतोय पण माणूस आपल्या मुळापासून दूर होतोय तर खरोखरच सुखी होत आहोत? दगदगीचा वातावरणात मानव भरकटत चाललाय. मानव ऐवढा स्वार्थीवृत्तिचा झालाय की स्वताचा फायद्यापोटी कोणाचे अहीत होत असले तरी ही स्वतालाच महत्व देतात. आपल्यात माणूसकी नसेल तर माणूस म्हणून घ्यायची लाज वाटायला हवी.

आपल्या डोळ्यासमोर वाईट घटना घडतांनी दिसून ही मनात दया करूणा उत्पन्न होत नाही तर आपण मानव नाही. माणसाची ओळख त्याचा कपड्यावरून होते कर्तृत्वावरून नाही.

निष्पाप हसू आता लहान बाळाच्या चेहîावरच दिसते. आदर व संस्काराचे अंत होत आहे. आज आपण कोणत्याही माध्यमांद्वारे बातमी ऐकली किंवा बघीतली तर आपल्याला कळते की समाजात किती अमानवीय घटना घडत आहेत. मानव ऐवढा स्वार्थी झाला की त्यांने पशु-पक्ष्यांचे क्षेत्रही हिरावून घेतले सोबतच पुढच्या पिढीच्या हिस्साचे नैसर्गिक संसाधने, ईंधन, शुद्ध जल, प्राणवायु, वने, हिरवेगार वातावरण संपवित चाललोय. प्रकृती मानवाशी कधीच भेदभाव करीत नाही पण मानव करतो.

आजचा काळात पैसा धर्म झालाय. भ्रष्टाचार, महिला मुलं व वृद्धांवर अत्याचार, जातीभेद, फसवणूक सारखे गंभीर गुन्हे रोजच घडतात. आजचा मानव श्रेष्ठत्वाचा स्पर्धेत धावत आहे. आपण चंद्रावर पोहोचलो तरी देखील पण आपल्या शेजारी कुणाचे घर आहे हे देखील माहित नसते.

स्वार्थी मानवीवृत्ती 

मानव आपल्या एक रूपयाचा फायद्याकरीता कोणाचा जिवासोबत ही खेळतात. खाण्यापिण्याचा वस्तुंमधे विषारी वस्तुंचे भेसळ यातीलच एक उदाहरण आहे. आतातर नात्यांमधे सुद्धा भेसळ दिसून येते, नात्यांना काळीमा फासणारे दृश्य समाजात घडतात म्हणजे तुमच्यासमोर तर खूप छान-छान बोलणारे पण मागे तेच नातलग शत्रूचा भूमीकेत असतात.

अनैतीक मार्गाने पैसे कमवून व्यसन फैशनच्या नावाखाली पैसा उधळत आहेत. नोकरीत भ्रष्टाचार, प्रत्येक ठिकाणी राजकीय हस्तक्षेप, शिफारस, श्रिमंत व गरीबांमधील वाढते अंतर समाजात असंतोष वाढवतात. आपल्या डोळ्यादेखतच कित्येकांचे आयुष्य फक्त संघर्षातच संपतानी दिसतात. एक भ्रष्ट व्यक्ती पुर्ण समाजाला कीड लावते. सामान्य व्यक्ती ही आपल्या अधिकाराचे जाणिव ठेवत नाही.

दुर्लक्षकेल्यामुळे समाजात नेहतीच समस्या उद्भवतात म्हणजे ऐकीकडे हाॅटेल, लग्न व कार्यक्रमात मोठ्याप्रमाणात वाचलेले अन्न बाहेर फेकल्या जाते, व दूसरीकडे आज ही खूप मोठी लोकसंख्या उपाशीपोटी राहते. विलासतेकरीता कोटी रूपये खर्च करतात, कुठे पाण्यासाठी दररोज कित्येक किलोमीटर फिरावे लागते तर कुठे पाण्याचे महत्वच कळत नाही.

रस्त्याचा कडेला पडलेला व्यक्ती मदतीकरीता लोकंाना हाक देतो पण कुणी मदत करीत नाही उलट त्याचे विडीयो व फोटो काढण्यात व्यस्त असतात. कुठे लहान मुले भूख-भूख करीत जीव गमावत आहेत पण माणुसकी दिसत नाही. अनाथआश्रम, वृद्धाश्रम वाढत आहेत आणी लोकांचे घर लहान होत चालले.

जगात माणूसकी सर्वात मोठा धर्म

मानवाचा कोणताही धर्म दूसîा धर्माचा द्वेष करायला शिकवत नाही अर्थात सर्वच धर्म न्याय शांती व समभावाची शिकवण देतात. पण मानवच धर्मात अंतर बघतो. सर्व मानव सारखेच मग हा भेदभाव कशाकरीता? जगात सगळीकडे गांवात शहरात जातीभेद करून गंभीर घटना घडतच चालल्या आहेत.

मुले अनाथ, लोकं बेघर होत आहेत. आजचा मानव मानवते कडे न वळता दानवते कडे वळत आहे. जगात कुठेही चांगल्या कामाचे कौतुक व वाईट घटनेवर बंधन घालायलाच हवे. सर्व प्राण्यांमधे मानवातच जास्त विचारशक्ती ची क्षमता आहे तरी सुद्धा पुष्कळदा रानटी प्राण्यापेक्षा जास्त वाईट कृत्य मानवच करीतो. प्रेमाने मन जिंकने दया, करूणा व निस्वार्थसेवा भाव हेच जगात माणूसकीचे आधार आहे. जगात माणूसकी पेक्षा मोठा कोणताच धर्म नाही.

श्रेष्ठत्व आणी ईर्षाभाव माणूसकीचे शत्रू

आजचा मानवात मी, माझा असा विचार येतो पण आपला असे विचार करणारे काहीच, म्हणजे स्वतापुरता विचार करणारे लोकांमधे स्वताचा श्रेष्ठत्व आणी इतरांप्रती ईर्षाभाव वाढला आहे. दूसîाचा यशावर मनाने दुखी तिरस्कारी व दूसîाचा दुखांवर स्वत आनंदी होतात व दूसîांनाच दोष देतात अशी प्रवृत्ती आहे.

नात्यात, मैत्रीत, परीवारात, शेजारात, आॅफिस, कोणत्याही ठिकाणी अशेच घडत असते. मानव का असा वागतो? मानवात माणूसकीच नसेल तर तो मानव कसला? जास्ततर गुन्हे ईर्षा व श्रेष्टत्वाचामुळेच घडतात ह्यामुळे सज्जन मानव फसला जातोय. बेईमान लोकं यशाकडे वाढत आहेत व ईमानदार संघर्षंच करत चाललाय.

आई-वडील दहा मुलांचे पालन करू शकतात पण दहा मुले मिळूण सुद्धा आपल्या आई-वडीलांचे पालन करू शकत नाही ह्यापेक्षा जगात काय दुर्भाग्य असणार. कित्येक ठिकाणी मानवाचे जीवन जनावरांपेक्षा ही वाईट परीस्थितीत आहे.

माणूसकी कमी असली तरी जीवंत आहे 

डाॅ. आंबेडकर, मदर टेरेसा, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद, अनेको संत समाजसेवकांनी आपले संपुर्ण जीवन जनतेच्या सेवेत खर्चले.

आज ही गढचिरोली चे आमटे परीवार, मेळघाटातील डाॅ. कोल्हे परीवार, सींधुताई सपकाळ, मेधा पाटकर सारखे माणसे अनेक खर्रा अर्थाने माणूसकी जीवंत ठेवून आहेत म्हणजे हे व्यक्तीगण जगात मोठ्या समृद्धी व विलासीतेचे जीवन जगू शकतात पण त्यांनी लोकसेवेसाठी जीवन जगायचे ठरविले. आता कोल्हापुरात आलेल्या महापुरात मदत करणारे कित्येक संस्था व लोकांनी, सेनेनी जी निस्वार्थ कामगीरी केली ती खरी माणूसकी.

कोणत्या रडत असलेल्या चेहîावर हसू आणनेच खरे आनंद आहे, भूकेल्याला अन्न दिल्यावर मनाला जे आत्मीक सुख मिळते ते सुख पैसांनी सुद्धा घेता येत नाही. एकमेकांवर प्रेम, मदत करणे, सहानुभूती, आदर मनात बाळगणे, समोरच्याला कधीही तुच्छ न लेखणे तो गरीब असो की श्रीमंत असो, जाती-धर्माचा भेदभाव न करता मनुष्यावर किंवा  कुठल्यातरी  प्राणी मात्रावर असो आपल्या मनात त्या विषयी प्रेम हाच खरा मानवता धर्म.

आपण किती ही धन कमविले असलो तरी पण उभ्या आयुष्यात जिंकलेली मने, मिळवलेलं प्रेम, केलेली मदत मरणानंतर सुद्धा जिवंतच राहते आणि यालाच आपण माणूसकीचा धर्म म्हणतो. आपल्याला माणसाचे जीवन मिळाले आहे तेव्हा ह्या छोट्याशा जीवनात सगळ्याबरोबर मिळून रहायला पाहीजे. आपणही आपल्या आयुष्यात  दुसऱ्यांच्या  जीवनासाठी, सुखासाठी, अधिकारासाठी मदत करू शकत असू तर आपण ही नक्कीच करायला हवे आणी हीच माणूस म्हणून आपली खरी माणूसकी आहे.

डॉ. प्रितम भि. गेडाम, मोबाईल क्रं. ०८२३७४१७०४१

prit00786@gmail.com

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!