Type to search

Blog : जागतिक कुटुंब दिन : एकत्रित कुटुंबही पूर्वी असायचे…बरं का!

आवर्जून वाचाच नाशिक ब्लॉग

Blog : जागतिक कुटुंब दिन : एकत्रित कुटुंबही पूर्वी असायचे…बरं का!

Share

खर तर शुभेच्छा देण्यापूर्तीच कुटुंब मर्यादित राहिलेत असं म्हणावं. आज कालच्या धावपळीत आणि तंत्रज्ञाच्या आहारी जाणाऱ्या धावत्या जगात कुटुंब, आपली माणसं टिकणं टिकवणं आणि जपवणं राहीलच कुठे? आणि ते तितकंसं म्हत्वाचंही वाटत नाही हल्लीच्या पिढीला…

आता एकत्र कुटुंब पद्धती सोडून ती मोडकळीस आणून विभक्त कुटुंब पद्धती उदयास येत आहे. ज्याला त्याला ज्याची त्याची स्पेस हवीय. त्यासाठीच हा सगळ्यांचा अट्टहास म्हणा ना! नवीन पिढीला तर एकत्र कुटुंबपद्धती ही कन्सेप्टच मान्य नाहीये, असणारही कशी? कारण एकत्र कुटुंब पद्धतीतील चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट आणि स्वतःच्या मनाला योग्य वाटणाऱ्याच गोष्टी मुलांना माहीत पडत असतील, तर नवीन पिढी का मान्य करेल एकत्र  कुटुंब पद्धतीचे फायदे.

पण माझी आज्जी सांगते आजही त्यांच्या पन्नास पन्नास जण एकत्र रहाण्याची मौज मजा सुख दुःख या सर्व कहाण्या …आज्जी जेव्हा त्या गोष्टी सांगत असते, तेव्हा विश्वास बसत नाही. इतकी लोक एका  छताखाली कशी आनंदी राहू शकता?

पण आज्जी म्हटली पूर्वी संपत्ती पाहून स्थळ नाही बघितली जायची. पूर्वी पैशांना नाही तर माणसांना किंमत होती. कुटुंब किती मोठं आहे? गोतावळा म्हणचे (नाती गोती) किती मोठीं आहेत? हे बघून मुलगी दिली जायची.

जी मुलगी मोठ्या कुटुंबात गेली तिचं नशीब चांगलं असं मानलं जायचं. घरातल्या बायकांनी भल्या पहाटे उठून जात्यावर ओवी म्हणून धान्य दळायचं मग पन्नास जणांच जेवण बनवायचं, कामं वाटून घायची, कपडे धुवायला नदीवर जायचं काम झाली की सर्व माणसांना जेवायला वाढायचं जेवण व्व्झालं की बायकांनी बसायचं.

पुन्हा संध्याकाळची काम असं नियमित चक्र असायचं. यात घरातील जो प्रमुख असेल तोच सर्वानुमते निर्णय घेईन त्याच्या शब्दा पुढे जाण शक्यच नाही बायकांनी मर्जीत राहायचं पुरुष आणि वयाने मोठया व्यक्तिपूढे जायचं नाही…

ते सांगताना आजीच्या चेहऱ्यावर अशी तानाची एकही रेघ दिसत नाही की ज्याचा या पूर्वीच्या नियमांचा तिला जाच वाटावा उलट तिला ते संस्कार आणि अभिमानच वाटतो त्याचा.

हे ऐकताना अनेक लोकांना महिला अन्यायात वाढत होत्या असं वाटतं. मलाही काही बाबतीत वाटतं… पण एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे जास्त होते असही मला वाटतं.

खरं तर विचार केला असता या दोन कुटुंब पध्दती एकात माणसं जवळ तर एकात दुरावलेली… मग काय साध्य केलंय नवीन पिढीने विभक्त होउन असा प्रश्न उपस्थित राहतो.

कुटुंब छोटी झालीयेत आणि त्यांचे विचारही. एकाच छताखाली असताना एकमेकांच तोंड पाहण्याची इच्छा नसलेलीही काही कुटुंब आहेतच की. स्पेस हविये या नावाखाली अजून किती लहान करणार आहोत आपण आपली कुटूंब? अगदी आपण  कष्टाने उभ्या केलेल्या घरात आपल्या मुलाला सुनेला आपला जाच होतो त्यांना त्यांची स्पेस हविये म्हणूनही वेगळे नव्हे तर वृद्धाश्रमात राहणारी आई बाप ही आहेतच की?

सो कॉल्ड मॉडर्न विचारांमुळे चार-चार मुलं असणारे आई बाप आजही अभागीच ठरतायेत… का हा अट्टाहास? एकत्र कुटुंब पद्धतीवरून विभक्त कुटुंब पद्धत स्वीकारल्यानंतरही तुम्हाला स्पेस हवीच. म्हणून अश्या बुरसटलेल्या आणि संधीसाधु आणि स्वार्थी विचारांपासून दूर होऊन एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्व आपल्या पुढील पिढीला समजवावे अस नाही का वाटत कुणाला.

शरीराने नको ना मनाने एकत्र राहण्याइतकीतीही स्पेस नाहीये आपल्या मनात आपल्याच लोकांसाठी….खूप दिवसांपासून बगतेय नको वाटतो तो द्वेष एकेकाळी जीवाला जीव देणारे भावंड एकमेकांच्या जीवावर उठताना बघवत नाही….

घरात चार भावंड असताना ज्या  आईने प्रत्येक मुलाला सारखाच जीव लावून वाढवलं असताना त्याच भावनडांच्या मनात आईच्या प्रेमाविषयी शंका ?कारण फक्त पैसा, संपत्ती आणि वाटा…जो आज आहे उद्या नाही अश्या गोष्टीसाठी …?

या सगळ्या गोष्टी बघुन ऐकून विट आलाय का कुणाला कळत नाही. जर आपल्या जीवाला जीव देणारी माणसंच या जगात राहिली नाही, तर आपण या मोहाच करणार काय?

आज रक्ताची नाती दूर करून मानलेली नाती जवळ करत आहोत. ती वाईट आहेत असं नाही, पण रक्ताची नाती जपायची नाहीतच का? आज जागतिक कुटुंब दिन..

या दिनी विभक्त कुटुंब पद्धती सोडून एकत्र कुटुंब पद्धतीचा विचार करावा अस म्हटले तर वावगे ठरू नये. जी नाती आहेत ती जपा..एकत्र राहू नका…पण कधीतरी आपुलकीने चौकशी करा. ख्याली खुशाली विचार.

निरोप परताळा विचारा…कारण आजचा दिवस जातोय तोच खरा. कारण सध्याच्या हायब्रीड खाण्याने आणि वागण्याने माणसं पटापट सोडून चाललीत नंतर दुःख करण्यापेक्षा  आत्ताच वेळही फक्त दोन शब्द गोड बोलावं एवढीच काय ती अपेक्षा…

लहान तोंडी मोठा घास असेल कदाचित काही वाक्य तुम्हाला समजणार नाहीत काही समजून घायची नसतील तरीही वास्तव ते वास्तवच समजून घ्याल. ही अपेक्षा आपल्या कुटुंबासाठी वेळ काढा आणि खरा कुटुंब दिवस साजरा करा.

जागतिक कुटुंब दिनाच्या सर्वांना शुभेच्छा

सपना कैलास बोरसे, डांगसौंदाणे

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!