Type to search

विश्वचषकाचा सलामीचा सामना दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये होणार

क्रीडा मुख्य बातम्या

विश्वचषकाचा सलामीचा सामना दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये होणार

Share

लंडन | येत्या  गुरुवारी (दि ३०) पासून  इंग्लंडमध्ये  क्रिकेट  विश्वचषकाला  सुरुवात  होणार  आहे . ही  स्पर्धा  ३० मे  ते  १४ जुलै  दरम्यान  होणार  असून स्पर्धेचा  सलामी  सामना  इंग्लंड  आणि  दक्षिण  आफ्रिका  या दोन  संघात होत आहे.

भारतीय   प्रमाणवेळेनुसार  दुपारी  ३ वाजता  लंडनच्या  केनिंगटन  ओव्हल  मैदानावर हा सामना खेळविण्यात  येणार  आहे.  इंग्लंड  संघाने   नुकत्याच  पाकिस्तानविरुद्ध  पार  पडलेल्या  एकदिवसीय  मालिकेत  सलग  तिसऱ्यांदा  ३५० पेक्षा  अधिक  धावांचा  पाठलाग  केला  आहे  पण  इंग्लंडला  मागील  ११ हंगामात  एकदाही  स्पर्धा  जिंकता  आलेली  नाही.

इंग्लंड  संघाच्या  फलंदाजीची  मदार जो  रूट , जॉनी  बेरीस्टो , जोस  बटलर ,इऑन  मॉर्गन , जेसन  रॉय  यांच्यावर  आहे.  अष्टपैलूंमध्ये  बेन  स्ट्रोक्स , जाफ्रा  आर्चर , क्रिस  वोक्स , लियम  प्लंकेट  आहेत.  गोलंदाजीची  मदार  मार्क  वूड , टॉम  कुरण , जाफ्रा  आर्चर , मोईन  अली यांच्यावर  आहे .

इंग्लंडप्रमाणेच  दक्षिण  आफ्रिका  संघालाही  विश्वचषक  अद्याप  जिंकता  आलेला  नाही.  दक्षिण  आफ्रिका  साखळीत चांगली  कामगिरी  करतो.  पण  उपांत्य  सामन्यांची  जेव्हा वेळ  येते  तेव्हा  हा  संघ  या  महत्वाच्या  सामन्यांचा  दबाव  सहन शकत  नाही .

आफ्रिकेच्या  फलंदाजीची  मदार  एडन  माक्रम , क्विंटन  डिकॉक , हाशिम  आमला , फाफ  डू  प्लेसिस , वंडर  डू  सेन , डेविड  मिलर  यांच्यावर  आहे.

अष्टपैलूंमध्ये  आंद्रे  पीटलूकवयो , जेपी  डुमिनी , प्रिटोरिअस  आहेत.  गोलंदाजीत डेल  स्टेन , कांगिसो  रबाडा , ऍड्रीच  नोटरीज , लुंगी  एनगिडी , इम्रान  ताहीर  हे  पर्याय  आहेत.  या  मैदानावरील  पहिल्या  डावातील  सरासरी  धावसंख्या  इंग्लंड  ३३४-४ विरुद्ध  भारत  १९७५ नीचांकी  धावसंख्या  दक्षिण  आफ्रिका  १०७ विरुद्ध  इंग्लंड  २००३ सर्वात  मोठा  विजय  इंग्लंड  २०२ रन्स विरुद्ध भारत  ७ जून  १९७५ मध्ये झाला आहे.

या  मैदानावर  सर्वाधिक  शतके  मार्कस  ट्रेस्कॉथिक याने झळकावली आहेत.  १३ सामने  सर्वाधिक  स्कोर  १३७ विरुद्ध  भारत  ३ शतके  २ अर्धशतके.

डेरेन  गॉफ  १६ सामने  १५ डाव  १३६ षटके  १० निर्धाव  ६१३ धावा  २७ विकेट्स.

आमनेसामने  १४५ इंग्लंड  विजयी  ५८ आफ्रिका  ३२

इंग्लंडमध्ये   ६४ २७ विजयी  इंग्लंड  १३ विजयी  आफ्रिका  २४ अनिर्णित

हवामान  ढगाळ  वातावरण  ५५% उष्णतेचा  अंदाज

या  खेळाडूंवर  असेल  नजर ; जॉनी  बेरिस्टो , बटलर , आमला  डिकॉक  ताहीर

दक्षिण  आफ्रिका : एडन  माक्रम , हाशिम  आमला , क्विंटन  डिकॉक , वेन्डर  डू  सेन , फाफ  डू  प्लेसिस , डेविड  मिलर , आंद्रे  पीटलूकवयो , प्रिटोरियस , जेपी  डुमिनी , डेल  स्टेन , लुंगी  एनगिडी , कांगिसो  रबाडा , अँड्रीच  नोटरीज , इम्रान  ताहीर तैब्झ  शम्सी

इंग्लंड : जॉनी  बेरीस्टो , जेसन  रॉय , जो  रूट , मोईन  अली , इयान  मॉर्गन , जोस  बटलर , जाफ्रा  आर्चर , लिअम  डॉसन , टॉम  कुरण , लिअम  प्लंकेट , आदिल  रशीद , जेम्स  व्हींस , बेन  स्ट्रोक्स , क्रिस  वोक्स , मार्क  वूड ,

सलिल  परांजपे,  नाशिक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!