Type to search

क्रीडा ब्लॉग सार्वमत

Blog : विश्वचषक – विराट कोहली उत्कृष्ट फलंदाज

Share

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा सहा गड्यांनी पराभव करत विश्वचषकाची सुरूवात दणक्यात केली आहे. रोहित शर्माच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताने विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला.

विराट कोहलीचा यंदाचा वर्ल्ड कप हा खेळाडू म्हणून तिसरा तर कॅप्टन म्हणून पहिलाच वर्ल्डकप आहे. कोहलीने आपल्या कारकिर्दीतील पहिला वर्ल्डकप 2011 साली खेळला होता. कोहलीने याआधी 2 वर्ल्ड कप खेळले आहे. या दोन्ही वर्ल्ड कपच्या टीम इंडियाच्या पहिल्या मॅचमध्ये विराटने शतकी कामगिरी केली आहे.

कोहलीने 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये बांग्लादेशविरुद्ध शतक ठोकले होते. तर 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिली मॅच पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध खेळण्यात आली होती. या मॅचमध्येही कोहलीने दमदार शतक ठोकले. कोहलीने बांगलादेश विरुद्ध 100 तर पाकिस्तान विरुद्ध 107 रन केले होते.

विराट कोहली जगातला एक सर्वोत्कृष्ट बॅट्समन तर आहेच. मात्र तो एक उत्कृष्ट कप्तान देखील आहे. धोनीने जेव्हा कसोटीच्या कप्तानीला पूर्णविराम दिला, तेव्हा निवड समितीची पहिली पसंती मिळाली ती विराट कोहलीला. विराटच्या खांद्यावर सध्या कप्तानपदाची जबाबदारी आहे.

5 जूनला झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला नमवत शानदार विजय मिळवला. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाचा हा 50 वा विजय ठरला आहे. एकदिवसीय सामन्यात 50 विजय मिळवणारा विराट कोहली चौथा भारतीय कर्णधार ठरला आहे.

भारतीय संघाला सर्वाधिक वेगवान 50 विजय मिळवून देणार्‍या कर्णधारांमध्ये विराट कोहली अव्वल स्थानावर पोहचला आहे. विराट कोहलीनं एम. एस. धोनी आणि सौरव गांगुलीसारख्या दिग्गज माजी कर्णधारांना मागे टाकले आहे. 50 विजयासाठी धोनी 110, मोहम्मद अजहरुद्दीन 90 आणि सौरव गांगुलीला 76 सामने वाट पहावी लागली होती. विराट कोहलीनं 69 व्या सामन्यात हा पराक्रम केला आहे.

विंडिजचे माजी कर्णधार व्हिव्हियन रिचर्डस यांचा विक्रम कोहलीनं मोडला. व्हिव्हियन रिचर्डस यांनी 70 सामन्यात संघाला 50 विजय मिळवून दिले होते. विंडीजचे क्लाइव लॉयड आणि ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉटिंग सर्वाधिक विजय मिळवण्यात संयुक्तरित्या अव्वल स्थानावर आहे. त्यांनी 63 सामन्यात संघाला 50 विजय मिळवून दिले आहेत. दुसर्‍या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचे हॅन्सी क्रोनिए आहेत.

दरम्यान, यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत आक्रमक शैलीच्या बळावर सतत सरस कामगिरी करीत माजी दिग्गजांच्या प्रशंसेस पात्र ठरलेल्या विराट कोहलीची कर्णधार या नात्याने अग्निपरीक्षा होणार आहे. सात आठवडे चालणार्‍या या स्पर्धेत कोहलीला 11 हजार धावांचा पल्ला गाठण्याची तसेच 41 शतकांमध्ये आणखी भर टाकण्याची मोठी संधी असेल.

-धनंजय शिंदे

9975734551

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!