Type to search

क्रीडा

दहा संघ, एक स्वप्न : ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याला सुरवात

Share

टयूटन : आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये लढत होणार आहे. हा सामना टयूटन कौंटी मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या संघांसोबत जेव्हा प्रतिस्स्पर्धी संघांना भिडायचे असते. तेव्हा त्यांच्यावर सर्वाधिक दडपण असते, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे दोन संघ सामन्याच्या अखेरच्या चेंडूपर्यंत उत्कंठा वाढवणारे असतात.

ऑस्ट्रलिया आणि पाकिस्तान या संघांचे ३ सामने झालेले असून पाकिस्तान संघाने १ विजय १ पराभव आणि एका अनिर्णित सामन्यासह ३ गुणाकमाई केली आहे ते गुणतालिकेत सध्या आठव्या स्थानावर आहेत तर ऑस्ट्रेलिया संघ ४ गुणांसह सध्या चौथ्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलिया संघाच्या फलंदाजीची मदार एरन फिंच, डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श आणि स्टीव्ह स्मीथ यांच्यावर आहे. अष्टपैलूंमध्ये मार्कस स्ट्रोइनीस , ग्लेन मॅक्सवेल, नेथन कुलतेर्नेल यांच्यावर आहे. गोलंदाजीत मिचेल स्टार्क, केन रिचडसन, जेसन बेरेंडॉफ, नेथन लायन, एडम झम्पा आहेत.

पाकिस्तान संघाच्या फलंदाजीची मदार इमाम ऊल हक, फकर झमान, बाबर आझम, मोहंमद हाफिज, शोएब मलिक यांच्यावर आहे. अष्टपैलूंमध्ये शादाब खान, इमाद वासिम आहेत. गोलंदाजीत वाहब रियाझ, जुनेद खान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहंमद अमीर आहेत .

हे मैदान कॉपर असोसिएशन या नावाने ओळखले जाते. या मैदानावरील सर्वाधिक धावसंख्या भारत ३७३-६ विरुद्ध श्रीलंका २६ मे १९९९
नीचांकी धावसंख्या अफगाणिस्तान १७२ विरुद्ध न्यूझीलंड ८ जून २०१९ सर्वात मोठा विजय भारत १५७ धावांनी विरुद्ध श्रीलंका २६ मे १९९९
निसटता विजय इंग्लंड ४७ धावांनी विरुद्ध श्रीलंका ११ जून १९८३ सर्वाधिक धावा करणारा फलंदाज १ सामना १८३ धावा सर्वाधिक स्कोर १८३ सौरव गांगुली सर्वाधिक शतके राहुल द्रविड १९९९ १४५ धावा एकूण चेंडू १२९ सर्वाधिक षटकार सौरव गांगुली ७ षटकार १९९९ सर्वाधिक विकेट्स जेम्स निशम १ सामना १० षटके १ निर्धाव ३१ धावा ५ विकेट्स

आमनेसामने १०३ ६७ विजयी ऑस्ट्रेलिया ३२ विजयी पाकिस्तान ३ निकाल नाही
विश्वचषकात एकूण सामने ९ ५ विजयी, ऑस्ट्रेलिया ४ विजयी पाकिस्तान

प्रमुख आकर्षण वॉर्नर, स्मीथ, मॅक्सवेल, मलिक, अमीर

हवामान : सामन्याच्या दिवशी ठराविक अंतराने पाऊस शक्य

पाकिस्तान : इमाम ऊल हक, अबिद अली, फकर झमान, शोएब मलिक, बाबर आझम, मोहंमद हाफिज, सर्फराज अहमद, असिफ अली, शादाब खान, हारीस सोहेल, इमाद वासिम, शादाब खान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहंमद अमीर, जुनेद खान, शाहीन आफ्रिदी, मोहंमद हंसीन, वाहाब रियाज

ऑस्ट्रेलिया : एरन फिंच, डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, स्टीव्ह स्मीथ, ग्लेन मॅक्सवेल, नेथन कुलतेर्नेल, मार्कस स्ट्रोइनीस, अलेक्स करी, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जेसन बेरेंडॉफ, केन रिचडसन, एडम झम्पा, नेथन लायन.

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!