ढूस यांना जागतिक स्पर्धेचे वेध

0

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ट्विटरद्वारे शुभेच्छा

अहमदनगर (प्रतिनिधी)- थायलंडमध्ये झालेल्या पॅरोमोटर या साहसी क्रीडा प्रकारात राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील अप्पासाहेब ढूस यांनी सुवर्णपदक मिळविले आहे. या यशाबद्दल ढूस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून अभिनंदन केले आहे. या यशामुळे ढूस यांनी आता जागतिक स्पर्धेची तयारी सुरू केली आहे.
एशियन-ओशियानिक पॅरामोटर चॅम्पियनशीप व वर्ल्ड पॅरामोटार चॅम्पियनशीप टेस्ट कॉम्पिटिशन (प्री वर्ल्ड कप) स्पर्धा नुकतीच थायलंड येथे पार पडली आहे. या स्पर्धेत भारतातून अप्पासाहेब ढूस व इंडिगो कंपनीतील वैमानिक पी. ओ. सिंग यांनी तर रशिया, जपान, ऑस्ट्रेलिया, कतार थायलंड आदी देशातील एखूण 67 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. राहुरी तालुक्यातील देवळालीप्रवरा येथील अप्पासाहेब ढूस यांनी प्युअर इकॉनॉमी टास्क या प्रकारात सुवर्णवेध घेतला आहे. या टास्कमध्ये ढूस यांनी 1 तास 28 मिनिटे 39 सेकंद इतका वेळ नोंदवून सर्वाधिक वेळ हवेत तरंगण्याचा विक्रम केला आहे. 3 हजार 500 फूट उंचीवरून उड्डाण घेत सर्वाधिक 18 गुणांची ढूस यांनी कमाई केली आहे.
दुसर्‍या क्रमांकावरील थायलंड येथील पायलट वोरावी विथायायाारनोन याने 1 तास 20 मिनिटे 28 सेकंद वेळ नोंदवून 13 गुण मिळविले आहेत.
थाललंडच्याच समन प्रोमनारी याने 1 तास 43 सेकंद इतकी वेळ नोंदवून तिसरा क्रमांक मिळविला आहे. अप्पासाहेब ढूस यांना स्पर्धेसाठी स्पेनच्या डेव्हीड ग्राऊपॅरा यांनी मार्गदर्शन केले आहे. भारताचे दुसरे खेळाडू सिंग यांना रजतपदकावर समाधान मानावे लागले आहे. ढूस यांंनी सुवर्ण पदकाची कमाई केल्याने त्यांचे सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे.
विशेष म्हणजे ढूस यांच्या यशाबद्दल त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केल्याने त्यांना आगामी स्पर्धेसाठी हुरूप आलेला आहे. आगामी काळात होणार्‍या जागतिक स्पर्धेसाठी ढूस यांनी आतापासून तयारीला लागलेले असून त्यामध्ये यश मिळविण्याचा निश्‍चय केलेला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना राहुरी तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांकडून शुभेच्छा दिल्या जात आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अप्पासाहेब ढूस यांचे कौतुक करून आगामी स्पर्धेसाठी मदत करण्याचे ट्टिवर नमूद केलेले आहे. त्यामुळे ते ढूस हे पंतप्रधानांच्या भेटीला तारीख घेऊन त्यांना दिल्लीला भेटायला लवकरच जाणार आहेत. 

LEAVE A REPLY

*