Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सेल्फी

जागतिक पुस्तक व प्रकाशनाधिकार दिनविशेष : गरजेप्रमाणे सार्वजनिक ग्रंथालयांचाही आधुनिक विकास व्हावा

Share

पुस्तक मानवाचे सर्वाेत्तम मित्र असतात जे नेहमी शांत व स्थिर असतात मार्गदर्शनात सर्वात सुलभ व बुद्धिमान असून शिक्षकाचा रूपाने धैर्यवान असतात.

पुस्तकाचे घर म्हणजे ग्रंथालय आणि ग्रंथालय शिक्षणाचा आत्मा असतो. ग्रंथालय हे शैक्षणिक, व्यावसायीक, ऐतिहासीक, खाजगी, विशेष व सार्वजनिक प्रकारचे असतात. यात सार्वजनिक ग्रंथालयाची भूमिका खूप महत्वाची आहे.

सार्वजनिक ग्रंथालय समाजाचा विकासाकरिता सतत रूपाने कार्य करीत असतात आणि समुदयातील प्रत्येक सदस्यांना समान रूपाने सेवा प्रदान करतात अर्थात समाजाचा विविधतेतील एकता आपल्याला अशा ग्रंथालयात पहायला मिळते. आजच्या आधुनिक वेळेत ग्रंथालयाचे महत्व फार वाढले आहे.

सार्वजनिक ग्रंथालयाचा विकासामधेही ही वाढ होत आहे पण विकासासोबतच काही अडचणी पण असतात. अशा अडचणींना दूर करून विकास करण्याकरिता क्षेत्रीय, राज्यिय, राष्ट्रिय स्तरांवर नेहमी प्रशासन, संगठना, संस्था द्वारे सुधारीत कामे केली जातात. प्रत्येक क्षेत्राचा विकासाचा आराखडा बनवून त्यावर ध्येयधोरणाचे उपाय-योजना करून अमलात आणले जातात.

विकासाकरिता संसाधन, वित्त, उत्कृष्ट संग्रह, वाचकांचा सहभाग, तज्ञ व कौशलप्राप्त कर्मचारी, नितीनियम, विपणन इत्यादी गोष्टिंचा सहभाग असतो. इथे अशाच काही गोष्टिंवर भर देण्यात आले आहे.

आजचा युगात मानवाला वावरण्याकरिता माहितीची जाण असणे गरजेचे असते. समाजाला जागृक व साक्षर बनविण्याच्या कार्यात सार्वजनिक ग्रंथालय महत्वाची भूमिका पार पाडतो. माणसाचा संपुर्ण जिवनात हे सहभागी असते.

ज्या प्रकारे शाळेचे ग्रंथालय व महाविद्यालयीन ग्रंथालय तिथल्या विद्यार्थांना शिक्षीत करते व विकसीत होण्यास मदत करते त्याचप्रकारे सार्वजनिक ग्रंथालय हे संपुर्ण समाजाला शिक्षीत करते ह्याचे क्षेत्र मोठे असते इथे येणारे वाचक वर्ग लहान मुले, महाविद्यालयीन विद्यार्थीं, युवा, प्रौढ व्यक्ती, गृहिणी असे सगळ्या तहृेचे वाचक येतात. विश्वाचा तळ्या-गळ्या पर्यंत पहुचणारे हे ग्रंथालय आहे. समाजाचा विकासात याचे खुप योगदान आहे. मनुष्याला आवश्यक असलेली माहिती त्याचा जवळच्या सार्वजनिक ग्रंथालयातून सहज उपलब्ध होते.

ग्रंथालयांचा विकास

आजच्या काळात जागतिक स्तरावर सगळीकडे नवनविन सुख-सुविधा आणी वेळेचे महत्व जाणून नविन तंत्रज्ञानाचा वापर वेळेचा बचतीकरीता होतोय व हे आजच्या काळात खूप गरजेचे ही आहे.

आज शहरात वाढत्या लोकसंख्येनुसार त्यांचा सुविधाकरीता मोठे रस्ते, सिमेंटीकरण, परीवहनाचे साधन, काॅन्वेंट, शाळा, महाविद्यालय, नविन विद्यापीठे, कंपन्या, मेडिकल अनुसंधान केंद्रे संस्थान, व्यावसायीक केंद्र, बैंक अशा कित्येक प्रकारच्या सुविधांवर कामे चालली आहेत.

शिक्षण क्षेत्रात मोठ्या संख्येने संस्थान वाढत आहेत. लोकांमधे शिक्षणाप्रती जागृकता ही वाढत आहे. आजच्या प्रतिस्पर्धेच्या युगात शिक्षणामधे ग्रंथालयाचे विशेष महत्वाची भूमीका आहे.

ग्रंथालयांनी वेळेप्रमाणे खुप प्रगती केली आहे. पारंपारीक ग्रंथालयापासुन यांत्रिककरण, संगणकीकरण, डिजीटल ते आजच्या व्हर्चुअल ग्रंथालयापर्यंत विकास झाला आहे म्हणजे आपण घरी बसल्या इंटरनेटच्या सहायाने जगातल्या मोठ-मोठ्या ग्रंथालयातील माहितीचा साठा चाळू शकतो, बघू शकतो, वापरू शकतो.

आज ग्रंथालयातील संग्रहणात पुस्तक व पत्रिकेच्या ठिकाणी ई-पुस्तक, ई-पत्रिकेने यांत्रीक साधनसामग्री ने जागा घेतली आहे. इंटरनेटच्या एका क्लिकवर जगभरातील माहिती आपल्यापर्यंत क्षणभरात उपलब्ध होते.

स्पर्धात्मक परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचा सार्वजनिक ग्रंथालयांकळे कल खूप वाढलाय

आजच्या आधुनिक युगात सगळीकडे म्हणजेच प्रत्येक क्षेत्रात प्रतिस्पर्धात्मकता दिसून येते. बेकारीच्या समस्येला लढा देण्याकरीता व रोजगाराच्या संधी मिळविण्याकरीता लाखो विद्यार्थी दररोज दुर-दुरून अभ्यासाकरीता सार्वजनीक ग्रंथालयात येतात. त्यांचा जिवनात ग्रंथालयाचे फार महत्व आहे.

सार्वजनिक ग्रंथालय अशा विद्याथ्र्यांना योग्य वातावरण निर्माण करून देते जेणेकरून विद्यार्थीं आपल्या ध्येयाला चांगल्याप्रकारे मिळवु शकतील. विद्याथ्र्यांकरीता प्रतिस्पर्धांत्मक पुस्तक, संदर्भ ग्रंथ, मासीका, वर्तमानपत्रे, विषयक्षेत्रातील तज्ञाकळून वेळो-वेळी मार्गदर्शन, इतर महत्वाचे संसाधन व साहित्य सामग्री सेवा वाचक वर्ग विद्यार्थांना दिली जाते अशा कारणामुळेच सार्वजनिक ग्रंथालयात वाचक विद्यार्थांची आकडेवारी वाढत चालली आहे.  शहरात तर जास्ततर सार्वजनीक ग्रंथालयात विद्यार्थांना अभ्यासाकरीता बसायला जागा सुद्धा मिळत नाही आहे ऐवढी वाचकांची गर्दी वाढतच चालली आहे.

स्थानिक प्रशासनाद्वारे संचालीत सार्वजनिक ग्रंथालयांची स्थिती

आज आपण माहीतीच्या काळात वावरतो. संपुर्ण जगात माहितीचे दळण-वळण फार वेगाने होत आहे. अश्या वेळेस समाजात सार्वजनिक ग्रंथालयाचे महत्व व जवाबदारी खूप वाढली आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा विकास ही याचाशीच संबंधीत आहे.

अशा प्रकारे आपल्या शहरात ही समाजाचा विकासाकरीता स्थानिक प्रशासनाद्वारे सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालयांचे संचालन केल्या जाते. प्रत्येक वार्डात कमितकमी एकतरी सार्वजनिक ग्रंथालय असावे जे समाजाचा प्रत्येक नागरीकाकरीता कोणत्याही भेदभाव विना सेवा देत राहील.

इथे लहान मुले, विद्यार्थी, युवा, वयोवृद्ध व्यक्तिगण, महिलामंडळी, गृहिणी अशा सगळ्या वाचकांकरीता वाचन साहित्य, वर्तमानपत्रे, मासीके, संदर्भ ग्रंथ व इतर वाचनसंग्रह असणे गरजेचे आहे. योग्य वातावरणात वाचन व अभ्यासाकरीता चांगले फर्निचर, यांत्रीकी संसाधन, कौशलतज्ञ शिक्षीत कर्मचारी, शिस्तबद्ध नितीनियमांचे पालन, ग्रंथालयात प्रकाश व पिण्याचा पाण्याची व्यवस्था, बाथरूम अशा सुविधा प्राथमिक गरजेत येतात.

स्थानिक प्रशासन अंर्तगत सार्वजनिक ग्रंथालयांची वर्तमान स्थितीत सुधारणा संबंधी काही गोष्टिंवर विचार करता येईल.

  • सार्वजनिक ग्रंथालयातील कार्यरत कर्मचारी वर्ग हे ग्रंथालय माहिती विज्ञान विषयातील प्रशिक्षीत कौशल्यत़ज्ञ शिक्षीत असायला हवे, संबंधित पदे रिक्त असल्यास त्वरीत भरती व्हायला हवी व अपडेट राहण्याकरीता वेळोवेळी कर्मचाîांकरीता प्रशिक्षण कार्यक्रम व्हायला हवे. तेव्हाच इथले कर्मचारी ग्रंथालयात दिल्या जाणाîा सेवा योग्यप्रकारे वाचक वर्गाला पुरवू शकतील.
  • पुष्कळशा ग्रंथालयाची इमाारत वाईट स्थितीत आहे, भिंत, खिडक्या, दारं, रंग खूप खराब अवस्थेत दिसून येतात. पावसाड्यात तर वाचनालयांची स्थिती आणखी खराब होते. अशा इमारतींना त्वरीत सुधरवायला हवे.
  • ग्रंथालयात वाचक वर्गांचा आकडेवारीप्रमाणे फर्निचर-कुर्सी व साधनसामग्री असायला हवी.
  • प्रत्येक वाचनालयात योग्य प्रकाश, पाणी व पंख्या संबंधीसाधन असायला हवे. ग्रंथालयाची वेळ पुर्णवेळ असायला हवी.
  • ग्रंथालयात वाचकाच्या अनुरूप योग्य वाचन साहित्य, संसाधने, संग्रह व यांत्रीक संग्रह सुद्धा असायला हवे.
  • नितीनीयम, सुव्यवस्था प्रणाली, वाचण्याकरीता योग्य स्वच्छ वातावरण व इतर सेवा सुविधा ग्रंथालयात असायला हवे.
  • ग्रंथालयाचा कोणत्याही कमतरतेेकडे जवाबदार अधीकाîांचे नेहमी लक्ष असायला हवे, योग्य बजेटची सुविधा, ग्रंथालयाचा विकासाकरीता प्रशासना तर्फे नेहमी प्रयत्नशिल वाटचाल व्हायला हवी.
  • आजच्या विकसीत सिटीचा वातावरणात स्थानिक प्रशासन सार्वजनिक ग्रंथालयात यांत्रिक संसाधनांचा वापर खूप आवश्यक आहे म्हणजे डिजीटल व व्हर्चुअल ग्रंथालयासंबंधी कार्याकडे वाटचाल त्वरीत झाली पाहीजे तेव्हाच गुणवत्तापुर्ण ग्रंथालयीन सेवा पुरविण्यात येतील.
  • शहरातील वाढती लोकसंख्येच्या प्रमाणात सार्वजनिक ग्रंथालयाची संख्या फार कमी आहे. शहराचा विकासा सोबतच सार्वजनिक ग्रंथालयांचे ही विकास सतत रूपाने व्हायलाच हवे व अशा ग्रंथालयांची संख्या वाढायलाच हवी.
  • ग्रंथालयांचा मधे संसाधन साहित्य सहभागीतेचा आणी समन्वय व्हायला हवे. नेटवर्कींग, चर्चासत्रे, संगोष्टी, कार्यशाळा, पुस्तक प्रदर्शनी, ग्रंथदिंडी व इतर कार्यक्रमांमधे पण सार्वजनिक ग्रंथालयांचा सहभाग दिसून आला पाहीजे.

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणारे मोठे, प्रसिö व साधनसंपन्न शहराची ही स्थिती सुधारायला हवी. ज्याप्रकारे स्थानिक प्रशासनाचे मोठ-मोठे बजट असते त्या मानाने ग्रंथालयावर जास्त प्रमाणावर बजट खर्च व्हायला पाहीजे. जेव्हाकी शहराच्या विकासामधे या ग्रंथालयांचा मोठा वाटा ठरू शकतो. सार्वजनिक ग्रंथालयांमधे दर्शविलेल्या ह्या सुझावांवर अमल केले तर हे समाजाचा विकासाला प्रगतिपथावर घेऊन जातील आणी समाजात चांगले वाचन संस्कृती, शिक्षासंस्कार, कलागुणांना वाव मिळेल.

ग्रंथपाल कसा असावा?

ग्रंथालयात वाचकांना सर्वोत्तम सुविधा सेवा पुरविणे, वाचकांचा वेळ वाचवूण योग्य मार्गदर्शन करणे ह्या मधे ग्रंथपालाची मोलाची कामगीरी असते कारणकी वाचक वर्ग ग्रंथालयात काही अडचणी, गरज, अपेक्षा, उद्देश घेवूण येतो. ग्रंथपालाला मार्गदर्शक, कौशल्यपुर्ण शिक्षक, व्यवस्थापक, भविष्याचा वेध घेणारा दुरदर्शी, अनुसंधानकर्ता, विश्लेषक, तंत्रज्ञानाचा ज्ञाता, अनेक विषयांचे ज्ञान अशा पुश्कळशा गोष्टिमधे निपुण असणे गरजेचे आहे कारण ग्रंथपालाला अशाच भूमिका पार पाडाव्या लागतात.

अशाप्रकारे नेहमी तत्पर राहण्याकरीता ग्रंथपालाचा अंगी जिज्ञासू प्रवृत्ति असायला हवी म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील नवनविन माहितीचा भरमसाठ साठा निर्मीत होतो तो जाणून घेण्याकरीता ग्रंथपाल नेहमी तैयार असायला हवे व अपडेट रहायला पाहीजे सोबतच ग्रंथपालामधे मृदूभाषी, सहकार्य, शिस्तप्रिय, वेळेचं महत्व समझणारे, अनुशासन, कर्तव्यवान व नेहमी ग्रंथालयाचा विकासासंबंधी प्रयत्नशिल अशे गुण असायला हवे.

पुस्तक प्रेमींकरीता तर सार्वजनीक ग्रंथालय हे जणू आनंदमय स्वर्गच आहे. ऐथून जगभरातील माहिती क्षणात मिळते. सार्वजनिक ग्रंथालय समाजातील सर्व लोकांकरीता सतत रूपाने सेवा देत असते. मानवी जिवनातील हे एक भाग झाला आहे.

समाजाचा विकासाकरीता ग्रंथालयांचा विकास करणे खूपच गरजेचे आहे. विदेशात सार्वजनिक ग्रंथालयांनी फार प्रगती केली आहे पण त्या मानाने आपल्या कडे ग्रंथालय मागासलेले दिसून पडतात तरी सुद्धा समाजात वेळेप्रमाणे सार्वजनिक ग्रंथालयाचे महत्व वाढतच चालले आहे आणी सकारात्मक बदल घडतोय. शैक्षणिक ग्रंथालयाप्रमाणेच ह्या ग्रंथालयांना सुद्धा यांत्रीकी, संगणकीकरण, डिजिटल, व्हर्चूअल जग बनविणे वेळेची गरज आहे.

प्रा. डाॅ. प्रितम भि. गेडाम, मोबाईल क्रं. 08237417041

prit00786@gmail.com

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!