Type to search

Breaking News ब्लॉग मुख्य बातम्या

जागतिक रक्तदान दिन : आपणही रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचवू शकता

Share

मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक नवनवीन प्रयोग करत आपले जीवन निरोगी व सुखकर करण्याचा प्रयास चालवला आहे. असे असूनही मानवाला आजतागायत रक्ताला पर्याय शोधता आला नाही. एका मानवाचेच रक्त दुसर्‍या गरजू मानवाला चालते. आजच्या युगात ते सर्वश्रेष्ठ दान मानले जात आहे. मानवी रक्ताला कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने रक्तदान करणे हा एकमेव पर्याय समाजापुढे आहे. आज जागतिक रक्तदान दिनानिमित्ताने…

रक्तदानासाठी काही सूचना :

– रक्तदान करण्यापूर्वी किमान ३ तास आधी पोटभर जेवून घ्यावे.
– रक्तदान झाल्यावर तुम्हाला दिलेला नाश्ता खा. नंतर व्यवस्थित जेवा.

यानंतर महत्वाचे म्हणजे अनेक लोकांना ब्लडग्रुप काय असतो हे माहित नसते.

रक्‍तगट (ब्लडग्रुप) म्हणजे काय?
जर सर्वच माणसांचे रक्‍त लाल असते तर त्यात फरक का असतो? तर हा फरक असतो रक्‍ताच्या गुणधर्मातील फरकामुळे. रक्‍ताची चार भागात विभागणी केली आहे. आपले रक्‍त प्रमुख्याने प्लाझ्मा, प्लेटलेट्स, पांढर्‍या पेशी व लाल पेशी या घटकांनी मिळून बनलेले आहे. त्याच प्रमाणे रक्‍तात एक प्रकारचे प्रोटीन (ऍण्टीजन) ही असतात.

या ऍण्टीजनच्या भिन्‍नतेमुळे वेगवेगळ्या माणसांचे रक्‍त वेगवेगळे असते. या वेगवेगळ्या रक्‍तांनाच रक्‍तगट वा ब्लडग्रुप म्हणतात. ए, एबी, बी, आणि ओ असे चार प्रमुख गट असून आर एच पॉझिटिव्ह व आर एच निगेटिव्ह असे या प्रत्येक गटाचे दोन प्रकार मिळून आठ रक्‍तगट होतात. ए. (प्रोटीन) असलेला ‘ए’ रक्‍तगट, बी असलेला ‘बी’ रक्‍तगट, दोन्ही असलेले ‘एबी’ रक्‍तगट यापैकी एकही प्रोटीन नसलेला ‘ओ’ रक्‍तगट.

रक्‍तातील आर एच हे सुध्दा एक प्रोटीनच, ज्यांच्या रक्‍तात ते असते त्यांना आर एच पॉझिटिव्ह व नसणाऱ्यांना आर एच निगेटिव्ह म्हणतात. रक्‍तगट अनुवंशिक नसतात. त्यामूळे भावा- बहिणींचे रक्‍तगट एकच असेल असे नाही.

‘ओ’ राक्‍तगटाचे रक्‍त इतर सर्व गटांना चालू शकते म्हणून या रक्‍तगटाच्या व्यक्‍तींना ‘युनिव्हर्सल डोनर’ असे म्हणतात. जगामध्ये ‘ओ’ रक्‍तगटाचे वर्चस्व असून या रक्‍तगटाची एकूण टक्‍केवारी ४६ टक्‍के आढळून येते. निगेटिव्ह रक्‍तगट दुर्मिळ असतात, त्यात एबी निगेटिव्ह रक्‍तगट तर पाच हजार व्यक्‍तींमध्ये एकाचा असतो. रक्‍तचढविण्या आधी रुग्णाचा रक्‍तगट आणि रक्‍तदात्याचा रक्‍तगट यांचे क्रॉसमॅच होणे जरुरी असते.

रक्‍तदान कोणी करावे व कसे?
रक्‍तदानासाठी आलेल्या रक्‍तदात्याची निवड करताना काही नियमावली घालून दिलेली आहे.

१] त्याचप्रमाणे रक्‍तदात्याचे वय १८ ते ६० पर्यंत असावे.
२] वजन ४५ किलोपेक्षा जास्त असावे. हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ ग्रॅम ट्क्‍क्‍यांपेक्षा जास्ते असावे.
३] हिमोग्लोबिनचे प्रमाण ठरविण्यासाठी निळया रंगाचा कॉपर सल्फेट द्राव वापरतात. रक्‍तदात्याच्या बोटातून घेतलेला रक्‍ताचा थेंब बुडाल्यास हिमोग्लोबिन १२.५ पेक्षा जास्त आहे असे ठरते.

४] रक्‍तदात्याने आधी किमान तीन महिने रक्‍तदान केलेले नसावे. हृदयरोग, मधुमेह, रक्‍तदाब किंवा इतर आजार व त्यामधील औषधे चालू असतील तर डॉक्टर सल्ला घ्यावा.
५] उपाशीपोटी किंवा खाऊन झाल्यावर अर्ध्यातासापर्यंत रक्‍तदान करु नये.

६] रक्‍तदात्याची निवड झाल्यावर विशेष निर्जंतुक बॅगेमध्ये ३५० मि.ली. रक्‍त घेतले जाते. या बॅगेमध्ये रक्‍त गोठू नये म्हणून द्रव आधीच मिसळलेला असतो. रक्‍त घेण्याच्या क्रियेसाठी सुमारे १० ते १५ मिनिटे इतकाच वेळ लागतो. प्रत्येक रक्‍तदात्यासाठी डिस्पोझेबल सुई व बॅग असल्यामुळे रक्‍तदात्यास रक्‍तदानापासून रोग संक्रमण होण्याची अजिबात भीती नसते. अशी ही रक्‍ताची बॅग विशिष्ट अशा शीतकपाटात २ ते ६ डिग्री अंश सेंटीग्रेड तपमानाला ठेवली जाते. या शीतकपाटात रक्‍त ३५ दिवस खराब न होता राहू शकते.

रक्तदान केल्यानंतर घ्यावयाची काळजी

 • व्यक्तीने रक्तदान केल्यानंतर आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तदानानंतर काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे.
  रक्तदानानंतर कमीत कमी ४ तास धुम्रपान करू नये.
 •  रक्तदानाच्या दिवशी जास्तीत जास्त पाणी घेणे.
 • रक्तदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे जड वाहन चालवू नये व अति उष्ण ठिकाणी काम करणे टाळावे.
 • रक्तदानाच्या दिवशी भरगच्च पोटभरून जेवण करू नये. हलक्या स्वरूपाच्या पदार्थाचे सेवन करावे.
 • रक्तदानाच्या दिवशी गोड आणि मांसाहार अन्नाचे सेवन करू नये.
 • हातावर व शरीरावर जास्त ताण पडणारे खेळ टाळावे. उदा. क्रिकेट, व्यायाम, गिर्यारोहण, मैदानी खेळ, इ.
 • रक्त काढलेल्या ठिकाणाहून रक्तस्त्राव होत असल्यास हात वर करून त्यावर दाब द्या.
 •  रक्तदात्यास चक्कर अथवा अंधारी येत आहे असे वाटल्यास झोपावे व पायाखाली उशी ठेवावी. तसेच शिबीरातील डॉक्टरांशी तात्काळ संपर्क साधावा.
 •  रक्तदानानंतर काही त्रास झाल्यास त्वरित रक्तपेढीच्या पत्त्यावर संपर्क करावा.
Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!