Type to search

Breaking News आवर्जून वाचाच नाशिक न्यूजग्राम मुख्य बातम्या

Video : World Biodiversity Day : ‘देशदूत’ संवाद कट्टा : जैविक साधनांचे सामूहिक संवर्धन व्हावे

Share

नाशिक। प्रतिनिधी

बायो डायव्हर्सिटी अर्थात जैव विविधता जतनातून पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. या गोष्टींमध्ये विविध जाती-प्रजातीचे प्राणी, पक्षी, वनस्पती यांची जैविक विविधता टिकवायची असल्यास मुळापासूनच काम करणे गरजेचे आहे.

भारतीय प्रजातीची झाडे, जलचर जिवांचे कचरा व्यवस्थापन यातून पक्षी, प्राणी, वनस्पती, झाडे यांच्यावर काय परिणाम होणार, या सगळ्यांकडे सजगतेने बघणे गरजेचे आहे.

आज चिमणी, पोपट गायब झाले आहेत. भविष्यात आणखी अनेक प्राणी, वनस्पतीही नष्ट होण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वच समाज घटकांच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्न करण्यांची गरज असल्याचा सूर ‘देशदूत’ संवाद कट्ट्यातून उमटला.

‘दैनिक देशदूत’ दर शनिवारी समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चात्मक ‘देशदूत संवाद कट्ट्या’चे आयोजन करीत असते. याउपक्रमांतर्गत
यावेळीच्या कट्ट्यात बायो डायव्हर्सिटी अर्थात जैव विविधता जतन या विषयावर मान्यवरांनी मत व्यक्त केले. त्यात चिमणी संवर्धनासाठी काम

करणारे ऑन दिलावर, सोशल नेटवर्कींग फोरमचे संचालक प्रमोद गायकवाड, पक्षीमित्र व झाडे लावा उपक्रमाचे प्रसारक अनिल माळी, वेस्ट मॅनेजमेंट व अर्थकेअर डिझाइनचे स्वरुप दंडनाईक, नमामी गोदा फाऊंडेशनचे राजेश पंडीत , देशदूतचे कार्यकारी संपादक वैशाली बालाजीवाले यांनी सहभाग घेतला होता.

यावेळी परिसरातील घटत्या पक्षांच्या संख्येवर सर्वांनीच चिंता व्यक्त केली. पक्षी, प्राणी, किटकांचा निवारा हा निर्धारित झाडांवर मोठ्या प्रमाणात असतो. पर्यावरणाच्या जतनात पारपारीक झाडांची लागवड होणे आपेक्षित आहे.

मात्र त्याप्रमाणात झाडे लावलेली नसून, विदेशी झाडांच्या लागवडीमुळे पशूपक्षी दूर पळाल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. चिमणी, पोपट दिसेनासे झाले आहेत.

त्यामुळे भविष्यात असाच प्रवाह राहील्यास आणखीही पक्षी प्राणी अदृष्य होण्याची भिती जाणकारांनी व्यक्त केली. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी समाजातील सर्वच स्थरातून सामूदायीक प्रयत्नांची गरज असल्याचा सूर मान्यवरांनी व्यक्त केला.

बायो डायव्हर्सीटी नष्ट होताना दिसत आहे. लोक काम करतात. मात्र ते दिशाहीन आहे. त्यातून नुकसानच झाले. या क्षेत्रात काम करणार्‍या सर्व संस्थांनी एकच दिशाठेवून काम केल्यास आगामी 10 वर्षात परिस्थिती बदलण्यास मदत होईल

-प्रमोद गायकवाड

पर्यावरणाचा समतोल राखण्याची जबाबदारीपर्यावरण वादी अथवा शासनाची नसून,यात सामान्यांचा सहभाग महत्वाचा आहे.चिमण्यांची संख्या कमी होते यावर सगळे बोलतात. मात्र उपाय योजना करताना दिसत नाही.घराघरातून सजगता वाढली तर निसर्गातील जैव विविधता टिकण्यासह माणसाच्या आयुष्यालाच त्याचा फायदा होईल

-ऑन दिलावर

शहरातील वनराईत मोठ्या प्रमाणात परदेशी झाडांची लागवड झालेली आहे. 47 लाख झाडांमध्ये 31 लाख विदेशी झाडे आहेत. त्यात 76 प्रजाती आहेत. मात्र यावर पक्षी अथवा प्राणी वास्तव्य करीत नाहीत. त्याच वेळी देशी प्रजातीच्या 16 लांख झाडांमध्ये 181 प्रजाती आहेत. .प्राणी पक्षी ठराविक जातीच्या वृक्षांवरच मोठ्या प्रमाणात राहतात.त्यामुळे त्यां प्रजातींचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे

-अनिल माळी

निसर्गाच्या र्‍हासाला आपणच जबाबदार आहोत. कचरा उचलण्याची जबाबदारी शासनावर ढकलतो. लहान मुलाना घरातूनच संस्कार मिळतात.आज प्लॅस्टिकचा मोठा प्रश्न आहे. सेंद्रिय खतांची निर्मिती प्रक्रिया कार्यान्वित करणेे गरजेचे आहे. रासायनिक खतांच्या वापरातून जिवजंतू नष्ट होत आहेत.त्याचा परिणामही पक्षांच्या जिवनावर होणारच आहेत.रसायांचा परिणाम पाण्यावरही होत असल्याने वृक्षवल्लींवरही त्याचा परिणाम होत आहे.

-स्वरुप दंडनाईक

सेंट्रल वॉटर बोर्डच्या माध्यमातून 6 राज्यांना इशारा देण्यात आला आहे. इको सिस्टीमसूधरवण्यासाठी प्रत्येकाला काम करावे लागेल. निसर्गाचा भाग होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपल्या लायकी, बुध्दी व इच्छेप्रमाणे एकाच उद्देशासाठी काम करणे गरजेचे आहे.

-राजेश पंडीत

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!